तीन तलाठी सजांचे ‘कुलूप बंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 06:19 PM2020-08-25T18:19:37+5:302020-08-25T18:19:48+5:30

दांडी व अतिरिक्त कामकाज : खानापूर व रावेर सजेचे कामकाज मात्र सुरळीत

'Talathi Bandh' of three Talathi sentences | तीन तलाठी सजांचे ‘कुलूप बंद’

तीन तलाठी सजांचे ‘कुलूप बंद’

Next


किरण चौधरी।
रावेर : शनिवार व रविवारच्या दोन दिवस सुट्टीनंतर मुख्यालय हजेरीच्या आठवड्याचा शुभारंभ करणाऱ्या सोमवारच्या पहिल्याचं दिवशी पाल येथील तलाठी गुणवंत बारेला यांच्याकडे स्वतंत्र सजा असतांना त्यांनी दांडी मारल्याने तर अटवाडे येथील तलाठी रवी शिंगणे हे कार्यालय बंद करून शेतात पीकपाहणी करायला गेल्याने व कर्जोद सजा तलाठी शैलेश झोटे यांचेकडे अतिरिक्त कार्यभार असल्याने तीनही तलाठी सजांचे कार्यालय ‘कुलूपबंद’ होते. मात्र खानापूर व रावेर तलाठी सजांचे कामकाज सुरळीत असल्याचे ‘लोकमत’ चे रिअ‍ॅलिटी चेक मध्ये आढळून आले.
सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सोमवार या आठवड्याच्या आरंभीच्या दिवशी आवर्जून मुख्यालयावर हजर राहावे असे संकेत आहेत. त्या अनुषंगाने ‘लोकमत’ ने तालुक्यातील अटवाडे, खानापूर, कर्जोद, रावेर व पाल या पाच तलाठी सजांवर अकस्मात भेट देऊन तलाठी आपापल्या सजेवर हजर असतात किंवा नाही ? यासंदर्भात ‘रिअ‍ॅलिटी चेक ’ची मोहीम सोमवार राबवली.
यावेळी पाल येथील तलाठी सजा कार्यालय सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास कुलूपबंद स्थितीत आढळून आले. त्यांच्याकडे सहस्त्रलिंग सजेचा अतिरिक्त कार्यभार होता मात्र प्रसुतीकालीन रजा आटोपल्यानंतर संबंधित महिला तलाठी यापुर्वीच रूजू झाले असल्याने, त्यांच्याकडे स्वतंत्र कार्यभार असताना कार्यालय कुलूपबंद आढळून आल्याने त्यांनी दांडी मारली ? की कामकाजानिमीत्त ते बाहेर होते ? यासंबंधी दुजोरा प्राप्त होवू शकला नाही.
दरम्यान, अटवाडे येथील तलाठी सजेवर नव्याने नियुक्त झालेले तलाठी रवी शिंगणे यांचे कार्यालयाचा दरवाजा कुलूपबंद आढळून आला. त्यासंदर्भात मात्र त्यांनी कार्यालय बंद करून पीकपाहणीसाठी शेती शिवारात गेल्याचे स्पष्ट केले. तलाठी शिवारात गेले म्हणून कार्यालय थेट कुलूपबंद करणे हे अव्यवहार्य असल्याने ती बाब सत्य असली तरी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न तर नाही ना! अशी आशंका व्यक्त केली जात आहे.
कर्जोद तलाठी सजा कार्यालय वाघोड येथे असून या तलाठी कार्यालयाचा दरवाजा कुलूपबंद आढळून आला. यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत होते.तर संबंधित तलाठी शैलेंद्र झोटे यांचेकडे केºहाळे बु येथील अतिरिक्त कार्यभार असल्याने ते केºहाळे बु. सजेवर कामकाज पाहत असल्याची माहिती प्राप्त झाली.
दरम्यान, खानापूर तलाठी सजेवर तलाठी बी.एन. वानखेडे व रावेर तलाठी सजा कार्यालयात तलाठी डी. व्ही. कांबळे यांचे सुरळीत कामकाज सुरू होते. तेथे शेतकरी व नागरीकांची गर्दी आढळून आली.

Web Title: 'Talathi Bandh' of three Talathi sentences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.