७०० रुपयांची लाच घेणाऱ्या वाडी येथील महिला तलाठीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 07:43 PM2018-04-13T19:43:07+5:302018-04-13T19:43:07+5:30

वडिलांच्या नावे असलेल्या मालमत्तेला वारस लावण्यासाठी ७०० रुपयांच्या लाचेची मागणी करणाºया पाचोरा तालुक्यातील वाडी येथील महिला तलाठी पुनम रामलाल वरकड (वय- ३०) व कोतवाल मधुकर चुडामण पाटील (वय-४२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार १३ रोजी अटक केली.

Talathi, a woman who took a bribe of 700 rupees, arrested | ७०० रुपयांची लाच घेणाऱ्या वाडी येथील महिला तलाठीला अटक

७०० रुपयांची लाच घेणाऱ्या वाडी येथील महिला तलाठीला अटक

googlenewsNext
ठळक मुद्देकोतवालामार्फत स्विकारली लाचपोलिसांनी केली दोघांना अटकपिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१३ : वडिलांच्या नावे असलेल्या मालमत्तेला वारस लावण्यासाठी ७०० रुपयांच्या लाचेची मागणी करणाºया पाचोरा तालुक्यातील वाडी येथील महिला तलाठी पुनम रामलाल वरकड (वय- ३०) व कोतवाल मधुकर चुडामण पाटील (वय-४२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार १३ रोजी अटक केली.
वडिलांच्या नावे असलेल्या मालमत्तेवर वारस लावण्यासाठी वाडी येथील तलाठी पुनम रामलाल वरकड यांच्याकडे भोजे येथील तक्रारदार अर्ज केला होता. मात्र त्यासाठी तलाठी यांनी २ एप्रिल रोजी ७०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या संदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांच्याकडे तकक्रार केली. त्यानुसार १३ रोजी सापळा लावण्यात आला. त्यात तलाठी पुनम वरकड यांच्या सांगण्यावरून कोतवाल मधुकर पाटील यांनी ७०० रुपयांची लाच स्विकारतांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Talathi, a woman who took a bribe of 700 rupees, arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.