तळीरामांनी तळपत्या उन्हात दारु दुकानासमोर ठोकला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 12:26 PM2020-05-06T12:26:09+5:302020-05-06T12:26:27+5:30

जळगाव : दीड महिन्यानंतर दारु दुकाने सुरु करण्याचे आदेश झाल्यानंतर मंगळवारी तळीरामांनी दुकाने सुरु होण्याआधीच दुकानांसमोर तळ ठोकल्याचे चित्र ...

 Taliram hit the ground in front of the liquor store in the scorching sun | तळीरामांनी तळपत्या उन्हात दारु दुकानासमोर ठोकला तळ

तळीरामांनी तळपत्या उन्हात दारु दुकानासमोर ठोकला तळ

Next

जळगाव : दीड महिन्यानंतर दारु दुकाने सुरु करण्याचे आदेश झाल्यानंतर मंगळवारी तळीरामांनी दुकाने सुरु होण्याआधीच दुकानांसमोर तळ ठोकल्याचे चित्र शहरात दिसून आले. भूक व तहान विसरुन दुकानांसमोर थांबून होते. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले तर काही ठिकाणी अक्षरश: फज्जा उडाला. दुपारुन भर उन्हात तळीरामांच्या रांगा लागल्या होत्या.
लॉकडाऊनमुळे २३ मार्चपासून मद्य विक्रीची दुकाने व बार बंद झाले होते. सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विदेशी मद्य विक्री करणारे वाईन शॉप, बियर शॉप व देशी मद्य विक्री करण्यास परवानगी दिली. मात्र जिल्ह्यात मंगळवारपासून दारु दुकाने सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी परवानगी दिली. त्यात सील बंद बाटलीतूनच मद्य विक्री करावी. दुकानावर पिण्यास मनाई, सोशल डिस्टन्सिंगंचे पालन, बॅरिकेटींग, सॅनिटायझरची फवारणी व ग्राहकांसाठी सॅनिटायझर अशा अटी-शर्ती घालण्यात आल्या आहेत.

काही लाजले, काहींनी दुसऱ्याला केले उभे
समाजात आपले वेगळे स्थान आहे, त्यामुळे आपण दारु दुकानाच्या रांगेत थांबलो आणि कोणी पाहिले तर काय? या भीतीने अनेकांनी विशिष्ट रक्कम देऊन मजुरी करणाºया तसेच ओळखीच्या लोकांना रांगेत उभे केले होते तर काही जणांनी मालकांशीच संपर्क करुन बाटल्यांची आधीच बुकींग केली.

सकाळी ९ वाजेपासून रांगा जिल्ह्यात मंगळवारपासून दारु दुकाने सुरु होणार असल्याने तळीरामांनी सकाळीच ९ वाजेपासून दारुच्या दुकानांच्या बाहेर तळ ठोकला होता. दुकाने सुरु व्हायला वेळ असला तरी आपल्यालाच लवकर मिळावी म्हणून तळीराम रांगेत होते. अनेक ठिकाणी शिस्त पाळण्यात आली तर काही ठिकाणी झुंबड उडाली होती.त्यामुळे अशा ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर दुकानदारांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली.

पहिला दिवस असल्याने दुकानांवर गोंधळ उडाला. त्यामुळे किती दारु विक्री झाली हे समजू शकले नाही.त्याची माहिती सादर करण्याच्या सूचना विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत.
-नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

Web Title:  Taliram hit the ground in front of the liquor store in the scorching sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.