तळोदा उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरींतर्फे रेमडीसीवीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 12:15 PM2021-04-08T12:15:21+5:302021-04-08T12:19:29+5:30
तळोदा : येथील नगर पालिकेचा उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांनी समाजातील गरजू,गरीब रूग्णांना 750 रेमदीसिविर इंजेक्शन बुधवारी उपलब्ध करून दिले ...
तळोदा : येथील नगर पालिकेचा उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांनी समाजातील गरजू,गरीब रूग्णांना 750 रेमदीसिविर इंजेक्शन बुधवारी उपलब्ध करून दिले आहे.या इंजेक्शन चा सर्वत्र तुटवडा भासत असताना त्यांनी माफक दरात उपलब्ध करून दिल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे. कोरोना महामारीन दिवसा गणित उग्र स्वरूप धारण केले आहे.साहजिकच रुग्ण संख्या वाढीवर देखील मोठा परिणाम झाला आहे.किरोणाच्या या नव्या स्त्रेन मुळे सिटी स्कान स्कोअर देखील वाढत असल्यामुळे खासगी दाखान्याकडून रुग्णांना रेमदिसिविर आणण्याची सूचना केली जात आहे. परंतू जिल्ह्यात सदर इंजेक्शनच्या प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.बाहेरील जिल्ह्यातून ते आणावे लागत आहे.आर्थिक परिस्थिती मुळे गरीब रुग्ण बाहेर जावू शकत नाही.दुर्लक्षित असलेल्या अशा रुग्णांसाठी येथील नगर पालिकेच्या उप नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जिल्हा बाहेरून 750 रेमदीसिविर आणून बुधवारी अशा गरजू रुग्णांच्या नातेवाइकांना अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिले आहे.नातेवाईकांनी इंजेक्शन साठी अक्षरशः भटकंती केली होती.या उपरांत सुध्दा मिळत नव्हते. उपनगरा ध्याक्षणी मिळवून दिल्याने नातेवाईकांनी त्यांचे समाधान व्यक्त केले आहे.इंजेक्शन मिळवून देण्यासाठी भाजप चे शहराध्यक्ष तथा पती योगेश चौधरी यांनी सहकार्य केले आहे.इंजेक्शन वाटपासाठी नितीन गरुड,कांतीलाल चौधरी,प्रमोद चौधरी, कालू पिंजारी,किरण महाले परिश्रम घेत आहेत.दरम्यान ज्या रुग्णांना अजून हे इंजेक्शन पाहिजे असेल त्यांनी सबंधित डा क्ट्ररचे सही शिक्क्याचे प्रिस्क्रीपशन,सिटी स्कॅन रिपोर्ट, पाजेटिव अहवाल ,आधार कार्ड अशी कागद पत्रे आणावीत.असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.