तळोदा ‘तहसील कचेरी’ला घाम!
By admin | Published: March 18, 2016 12:43 AM2016-03-18T00:43:04+5:302016-03-18T00:43:04+5:30
थकबाकीपोटी वीज कापली : अंधारात कामकाज
कोठार : वीज बिलाचे थकीत पाच लाख रुपये न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने थेट तळोदा तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला़ यामुळे गेल्या दोन दिवसांपासून तहसील कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले असून, हे कार्यालय अंधारात आह़े पाच लाख 40 हजार 520 रुपये थकबाकी असल्याने कंपनीकडून दोन वेळा बिलाचा भरणा करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती़ महसूल विभागाने तहसील कार्यालयाच्या वीज वापराचे शेवटचे बिल जून 2015 रोजी 67 हजार रुपये कंपनीकडे जमा केले होत़े त्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरअखेरीस बिल भरले नसल्याने ऑक्टोबर महिन्यात नोटीस बजावण्यात आली होती़ या नोटिसीला तहसील कार्यालयाने दाद न दिल्याने 17 जानेवारी 2016 रोजी कंपनीकडून एक दिवसापुरती वीज बंद करण्यात आली होती़ या कारवाईनंतर धास्तावलेल्या तहसील कार्यालय प्रशासनाने पत्र देऊन निवडणुकीची ऑनलाइन कामे सुरू असल्याने वीजपुरवठा खंडित करू नये, अशी विनंती करत, शासकीय अनुदान नसल्याने वीज बिल भरण्यास विलंब झाला असल्याने यापुढे वीज बिल भरणा करण्यात येईल, असे कंपनीला कळवले होत़े त्यानंतर कंपनीने वीज सुरू केली होती़ तरीही बिल न भरल्याने फेब्रुवारीमध्ये वीज कंपनीने तहसील कार्यालयाला नोटीस दिली होती़ मात्र बिल न भरल्याने 16 मार्चपासून वीजपुरवठा खंडित केला आह़े.