भुसावळात तालुका विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 09:58 PM2018-12-12T21:58:11+5:302018-12-12T21:59:38+5:30

डी.एल.हिंदी स्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. या प्रदर्शनाचा समारोप झाला. आमदार संजय सावकारे अध्यक्षस्थानी होते.

Taluka Science Exhibition of Bhusaval concludes | भुसावळात तालुका विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

भुसावळात तालुका विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

Next
ठळक मुद्देतालुक्यातील विविध शाळांचा सहभागमान्यवरांनी विद्यार्थ्यांना संशोधन करण्याविषयी केले आवाहन

भुसावळ, जि.जळगाव : डी.एल.हिंदी स्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. या प्रदर्शनाचा समारोप झाला. आमदार संजय सावकारे अध्यक्षस्थानी होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संशोधन करण्याचे आवाहन केले.
हिंदी सेवा मंडळाचे शिक्षण सभापती आर.जी.नागराणी यांनी उद्घाटन केले. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष अ‍ॅड.एम.डी.तिवारी, सहमंत्री बिशन अग्रवाल, कार्यकारणी सदस्य गोपालदास अग्रवाल, मनोज बियाणी, शालेय पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण तुषार, प्रधान डी.एल.हिंदी विद्यालयाचे प्राचार्य आर.आर.सहानी, सु.ग.टेमाणी विद्यालयाच्या प्राचार्य रमा तिवारी, र.न.मेहता विद्यालयाच्या प्राचार्य रंजना शर्मा, उपप्राचार्य एस.टी. अडवाणी पर्यवेक्षक के.बी.सक्सेना आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते यांनी केले. निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी हिंदी सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडीयाले होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी महेंद्र मते, केंद्रप्रमुख नलिनी झांबरे, रवींद्र तिडके, विज्ञान समितीचे प्रमुख एस.एस. अहिरे, सुनील वानखेडे, बी.बी.जोगी, बी.पी.वारके, प्राचार्य आर.आर. सहानी, प्राचार्य सुधा शुक्ला आदी उपस्थित होते
जिल्हा स्तरासाठी निवडण्यात आलेली उपकरणे-
प्राथमिक गट : प्रथम- राहुल मेहेरे जि.प.शाळा कन्हाळा सफाई यंत्र, द्वितीय सपना पाटील, बियाणी मिलिटरी स्कूल ग्रीन फीवेल किट तृतीय भूषण वावले, डी.एल.हिंदी विद्यालय स्मार्ट सिटी
माध्यमिक गट : प्रथम- अजिंक्य चौधरी डी.एल.विद्यालय, वॉटर मॅनेजमेंट, द्वितीय- शिवमकुमार भंगाळे, के.नारखेडे विद्यालय, कॉन्सेप्ट आॅफ एरोप्लेन, तृतीय- यश कोठारी, बियाणी इंग्लिश मीडियम स्कूल, स्मार्ट फार्मिंग.
प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य : प्रथम- शारदा सुरवाडे जि.प.शाळा पिंपळगाव खुर्द मनोरंजनातून शिक्षण.
माध्यमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य : पी.पी. मोयखेडे, डी.एल.हिंदी विद्यालय, भौमितिक बहुउद्देशीय उपकरणे, प्राथमिक लोकसंख्या शिक्षण, अमित चौधरी र.न.मेहता विद्यालय लोकसंख्या शिक्षण, माध्यमिक लोकसंख्या शिक्षण, कविता अग्रवाल डी.एल. हिंदी विद्यालय लोकसंख्या शिक्षण
प्रयोगशाळा परिचर- बी.जे.सोनवणे, डी.एल.हिंदी विद्यालय, पर्यावरणाचा ºहास
परीक्षक म्हणून दीपक जंगले, अमितकुमार परखड, सी.डी. पाटील, आर.बी.इंगळे, निरंजन पेंढारे, मनीषा भारंबे, नवनीत सपकाळे, भूषण वाघुळदे, वनिता अग्रवाल, सुभाष महाजन, प्रशांत वंजारी, दिलीप बोरोले यांनी काम पाहिले.
यावेळी डी.एल.हिंदी विद्यालय, र.न.मेहता विद्यालय व सु.ग.टेमाणी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. याबद्दल त्यांचा शिक्षण विभागाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

 

Web Title: Taluka Science Exhibition of Bhusaval concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.