यावल तालुक्यातील दहिगाव येथे तालुका विज्ञान प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:10 PM2018-12-14T22:10:26+5:302018-12-14T22:12:16+5:30
डोंगरकठोरा, ता. यावल , जि.जळगाव : विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेतल्यास अशा विज्ञान प्रदर्शनातूनच शास्त्रज्ञ घडू शकतो. यासाठीच विज्ञान प्रदर्शनाची ...
डोंगरकठोरा, ता.यावल, जि.जळगाव : विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेतल्यास अशा विज्ञान प्रदर्शनातूनच शास्त्रज्ञ घडू शकतो. यासाठीच विज्ञान प्रदर्शनाची गरज असते, असे प्रतिपादन आमदार हरिभाऊ जावळे यांनी केले. यावल पं. स.च्या शिक्षण विभागातर्फे दहिगावच्या आदर्श विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पं. स. सभापती पल्लवी चौधरी होत्या. प्रदर्शनात १८६ उपकरणे मांडण्यात आली होती.
प्रमुख पाहुणे उपसभापती उमाकांत पाटील, जि. प.सदस्या सविता भालेराव, रवींद्र पाटील, नंदा सपकाळे, पं. स. सदस्य शेखर पाटील, कलिमा तडवी, दीपक पाटील, एकात्मिक आदिवासी अध्यक्ष मीना तडवी, गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, संस्था चेअरमन सुरेश पाटील, हिरालाल चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, राजाराम महाजन, मेघश्याम चौधरी, साजिया तडवी, देवीदास पाटील, साकीर तडवी, जयंत चौधरी, नीता साठे, गटशिक्षणाधिकारी एजाज शेख, शिक्षण विस्तार अधिकारी गणेश शिवदे, नईम शेख, केंद्रप्रमुख विजय ठाकूर, विजय मेढे, एन.डी. तडवी,सुरेश तायडे, सलिम तडवी, प्रमोद सोनार, प्रदीप सोनवणे, सुलोचना धांडे, तालुका समनव्यक नरेंद्र महाले, मुख्याध्यापक एस.डी. चौधरी, जी.एस. पाटील, एम.आर.महाजन उपस्थित होते.
प्रास्ताविकात एजाज शेख यांनी विविध वैज्ञानिकांनी लावलेले शोध व त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी झालेला फायदा यांची माहिती दिली.
प्रदर्शनात बाल वैज्ञानिकांनी विविध लक्षवेधी उपकरणे, प्रतिकृतींची मांडणी केली होती. त्यात प्राथमिक ५४,माध्यमिक ३८ ,तर शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य ९४ अशी एकूण १८६ उपकरणे मांडण्यात होती. प्रदर्शनात कृषी व जैविक शेती, आरोग्य व स्वच्छता, संसाधन व व्यवस्थापन, वाहतूक व दळणवळण, गणितीय प्रतिकृती आदी विषयाशी निगडीत उपकरणे होती. सूत्रसंचालन व आभार विलास पाटील यांनी मानले. परीक्षक म्हणून गणेश जावळे, पी.एम. इंगळे, सुनील पाटील, पी.एम. जोशी, खान होते.
विज्ञान उपकरणे विजयी स्पर्धक
प्राथमिक स्तर-प्रथम वेदांत नेवे (शारदा विद्यामंदिर,साकळी), द्वितीय सुशांत बारी (कुसुमताई विद्यालय,फैजपूर), तृतीय अतल पटेल (ऊर्दू, कोरपावली).
माध्यमिक स्तर- प्रथम अक्षय पाटील, हर्षवर्धन पाटील (आदर्श विद्यालय, दहिगाव), द्वितीय संजना नेमाडे (ज्योती विद्यामंदिर, सांगवी), तृतीय संकेत फेगडे े(न्यू इंग्लिश स्कूल भालोद). शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य- प्राथमिक प्रथम बागवान अहमद (उर्दू, मारुळ ) व कल्पना माळी (जि. प.परसाळे), माध्यमिक प्रथम मनोज महाजन (शारदा विद्यालय, साकळी). लोकसंख्या शिक्षण- प्रथम जयश्री काळवीट (जि. प.निमगाव). आदिवासी शाळा-प्रथम मोहिनोद्दीन तडवी (आश्रमशाळा, मोहरळे).