भर पावसाळ्यात जळगाव जिल्ह्यात 47 गावांना टँकर

By admin | Published: June 27, 2017 04:36 PM2017-06-27T16:36:46+5:302017-06-27T16:36:46+5:30

सर्वाधिक 33 टँकर अमळनेर तालुक्यात. जून अखेरही पाणीटंचाई कायम.

Tankers for 47 villages in Jalgaon district | भर पावसाळ्यात जळगाव जिल्ह्यात 47 गावांना टँकर

भर पावसाळ्यात जळगाव जिल्ह्यात 47 गावांना टँकर

Next

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.27 - पावसाळ्याला सुरुवात होऊनही जून अखेर जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती कायम आह़े सद्यस्थितीत जिल्ह्यातील 47 गावांमध्ये एकूण  25 टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आह़े आणखी काही दिवस समाधानकारक पाऊस न पडल्यास पाणीटंचाईचे संकट गडद होणार आहे.
अमळनेर तालुक्यात 33 गावांमध्ये टँकर
जिल्ह्यातील एकूण 47 गावांमध्ये 9 शासकीय व  16 खाजगी अशा 25 टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आह़े यात जळगाव तालुक्यात 1, जामनेर तालुक्यात 6, अमळनेर तालुक्यात 33, भुसावळ 1, व पारोळा तालुक्यातील 6 अशा एकूण 47 गावांचा समावेश आह़े अमळनेर तालुक्यात सर्वाधिक 33 गावांमध्ये 14 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यासह जळगाव तालुक्यात 1, जामनेर तालुक्यात 5, पारोळा तालुक्यात 4 व भुसावळात 1 असे 11 टँकर सुरू आहेत़
गेल्या वर्षापेक्षा जिल्ह्यात दुप्पट पाऊस
पावसाळ्याला वेळेवर सुरुवात झाली़ जून अखेर जिल्ह्यात 14़8 टक्के एवढा पाऊस पडला आह़े 2016 मध्ये जून अखेर सरासरी 7़4 टक्के इतकाच पाऊस पडला आह़े गेल्या वर्षाच्या तुलनेत अद्यापपावेतो दुप्पट पाऊस झाला आह़े मात्र तरीही पाणीटंचाई कायम असल्याचे चित्र आह़े

Web Title: Tankers for 47 villages in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.