तापी-गिरणा पट्ट्याला वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:34 PM2019-06-08T12:34:15+5:302019-06-08T12:34:41+5:30

केळीचे प्रचंड नुकसान

Tapi-Girna belt gets torrential rain | तापी-गिरणा पट्ट्याला वादळी पावसाचा तडाखा

तापी-गिरणा पट्ट्याला वादळी पावसाचा तडाखा

Next

जळगाव : तालुक्यातील गिरणा-तापी नदीच्या काठावरील भोकर, कठोरा, किनोद, आमोदा, सावखेडा, पळसोद भागात शुक्रवारी पुन्हा झालेल्या वादळीपावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ३ जून रोजी झालेल्या वादळी पावसामुळे देखील या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आठवड्याभरातच दोनवेळा वादळी पावसाने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे.
यंदा दुष्काळ असल्याने गिरणा-तापी नदीलगतच्या गावांना देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळामुळे अनेक ट्युबवेल्स आटल्या असल्याने केळीला पाणी देणे देखील कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत जेमतेम तग धरलेल्या केळीच्या कांदेबागाचे वादळी पावसामुळे नुकसान झाल्याने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. तसेच गेल्या वर्षी देखील जून महिन्यात झालेल्या वादळी पावसाची अद्याप देखील नुकसान भरपाई मिळाली नसताना त्यात यंदा झालेल्या नुकसानाची भर पडली आहे.
३ जूनच्या वादळात वाचलेली केळीही भुईसपाट
शुक्रवारी दुपारी ४ ते साडे चार दरम्यान अर्धातास झालेल्या वादळी पावसामुळे केळीचे नुकसान झाले आहे. ३ जून रोजी झालेल्या वादळी पावसात ज्या केळी बागांचे नुकसान झाले नव्हत्या त्या बागांचेही नुकसान या पावसात झाले आहे. ४० ते ४५ किमीच्या वेगाने वाहत जाणाºया वाºयांमुळे केळीसह चाºयाचेही नुकसान झाले आहे. काही भागात विजेचे खांब पडल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता.
पंचनाम्यासाठी थांबावे की खरीपाची तयारी करावी ?
भोकर महसुल मंडळात १४ एप्रिल रोजी देखील वादळी पाऊस झाला होता. तसेच आता आठवड्यात दोन वेळा वादळाचा तडाखा बसला आहे. शेतकºयांनी केळी पिक विमा काढला असला तरी वादळानंतर ४८ तासात विमा कंपनीला कळवून पंचनामा करून घेणे गरजेचे आहे.
खरीपाची तयारी करावी कशी...
दरम्यान, आता शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. अशा परिस्थितीत पंचनाम्यासाठी थांबावे की खरीपाची तयारी करावी असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे. या भागातील एकूण नुकसान पाहता सरसकट केळी विमा धारकांना विम्याचा लाभ मिळावा अशी मागणी कठोरा येथील केळी उत्पादक शेतकरी डॉ.सत्वशील पाटील यांनी केली आहे.
खेडी, आव्हाणे येथे तीन तास वीज पुरवठा खंडित
जळगाव : शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे खेडी, आव्हाणे व फुपनगरी या गावातील वीज पुरवठा सायंकाळी साडेसात पासून खंडित होता. काही ठिकाणी विद्युत खांब व वीज तारा कोसळ््यामुळे हा वीज पुरवठा खंडित झाल्याचे महावितरणच्या नियंत्रण कक्षातर्फे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचारी संबंधित गावांना रवाना झाले होते. रात्री उशिरापर्यंत महावितरणच्या कर्मचाºयांनी काम करुन, वीज पुरवठा सुरळीत केला. दरम्यान, ऐन उन्हाळ््यात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे, नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.

Web Title: Tapi-Girna belt gets torrential rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव