तापी पाटबंधारे महामंडळाचे बँक खाते सील, जलसंपदामंत्र्यांच्या जळगाव जिल्ह्यातच ओढावली नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:06 PM2018-09-28T12:06:36+5:302018-09-28T12:07:29+5:30

४० कोटींची रक्कम देण्यास तापी महामंडळाकडून टाळाटाळ

Tapi Irrigation Corporation's bank account seal, Jalpa mantra's Jalgaon district imposes ill treatment | तापी पाटबंधारे महामंडळाचे बँक खाते सील, जलसंपदामंत्र्यांच्या जळगाव जिल्ह्यातच ओढावली नामुष्की

तापी पाटबंधारे महामंडळाचे बँक खाते सील, जलसंपदामंत्र्यांच्या जळगाव जिल्ह्यातच ओढावली नामुष्की

Next
ठळक मुद्देमहामंडळाचे आर्थिक व्यवहार ठप्पसील लवकर न उघडल्यास कर्मचाऱ्यांचे पगारही लांबणीवर पडण्याची शक्यता

जळगाव : न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही चाळीसगाव तालुक्यातील येथील प्रकल्पग्रस्त शेतकºयांना भूसंपादन मोबदल्याची रक्कम न दिल्याने न्यायालयाने तापी पाटबंधारे महामंडळाचे बँक खाते सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आठ दिवसांपासून महामंडळाचे बँक खाते सील झाल्याने महामंडळाचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. जलसंपदामंत्र्यांच्या जिल्ह्यातच असलेल्या तापी महामंडळावर ही नामुष्की ओढावली आहे.
मुंदखेडा येथील प्रकल्पग्रस्तांची वाढीव मोबदल्याची सुमारे ४० कोटींची रक्कम देण्यास तापी महामंडळाकडून टाळाटाळ केली जात असल्याने शेतकºयांनी पुन्हा न्यायालयात धाव घेत न्यायालयाच्या आदेशाचा तापी महामंडळाने अवमान केल्याची तक्रार केली. त्यामुळे न्यायालयाने तापी महामंडळाचे बँक आॅफ महाराष्टÑमध्ये असलेले एकमेव बँक खाते सील करण्याचे आदेश दिले.
सील लवकर न उघडल्यास कर्मचाºयांचे पगारही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याबाबत लघुपाटबंधारे प्रकल्प विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला.

Web Title: Tapi Irrigation Corporation's bank account seal, Jalpa mantra's Jalgaon district imposes ill treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.