तरसोद गणपती मंदिर भक्तांसाठी राहणार खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:15 AM2021-02-15T04:15:28+5:302021-02-15T04:15:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरापासून अवघ्या सात कि.मी. दूर असलेल्या तरसोद येथील गणपती मंदिर गणेश जयंतीनिमित्त भक्तांसाठी खुले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरापासून अवघ्या सात कि.मी. दूर असलेल्या तरसोद येथील गणपती मंदिर गणेश जयंतीनिमित्त भक्तांसाठी खुले राहणार असून, गणेश जयंतीनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता गायत्री यज्ञ होणार असून, तसेच बाप्पांचा जन्मदिवस साजरा केला जाणार असल्याची माहिती गणपती मंदिराचे पुजारी गजानन कुलकर्णी यांनी दिली.
तरसोद येथील पेशवेकालीन गणपती मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून संपूर्ण खान्देशात प्रसिध्द आहे. दरम्यान, अनेक वर्षांपासून तरसोदच्या गणरायाची वाट बिकट झाली होती. तरसोद फाटा ते गावापर्यंतचा रस्ता खराब झाल्याने भाविकांना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, यंदा या रस्त्याला बाप्पा पावला असून, तरसोद येथील रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वी झाले आहे. यामुळे यंदा भाविकांचा मार्ग सुकर होणार आहे.