तरुणाई साकारतेय स्मृतीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:20+5:302021-07-07T04:20:20+5:30

सामनेर : तरुणांच्या सर्वोदय संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण समृद्ध ग्राम संकल्पना राबविली जात आहे. यात वृक्ष लागवड व संवर्धनासाठी ...

Tarunai Sakartey Smritivan | तरुणाई साकारतेय स्मृतीवन

तरुणाई साकारतेय स्मृतीवन

Next

सामनेर : तरुणांच्या सर्वोदय संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण समृद्ध ग्राम संकल्पना राबविली जात आहे. यात वृक्ष लागवड व संवर्धनासाठी सातत्याने पावले उचलली जात असतात. आताही अमरधाम, कब्रस्तान तसेच नदी काठावर तसेच रस्त्याच्या दुतर्फा ‘वटवृक्ष’ लागवड करत स्मृतीवन साकारण्यात येत आहे.

स्मृतीवनात कृषी दिनाचे औचित्य साधत कृषी संस्कृतीत आपले आयुष्य वेचलेल्या पूर्वज, वाडवडील, मातृ-पितृ तसेच प्रियजन यांचे स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या स्वकीयांकडून वटवृक्ष लागवड करण्यात येत आहे. स्मृतीवनात २०० झाडांचा प्रकल्प संस्था व गावातील विविध स्थरातील सर्वधर्मीय समाजघटकांकडून काम उभे केले जाणार आहे. गावातील नौसेनेत, सैन्य सेवेत, पोलीस सेवेत असणाऱ्या तसेच विविध पदावर कार्यरत समाजघटकांकडून वेळोवेळी उपक्रमास भरीव योगदान लाभत आहे.

सर्वोदय ‘हरित निर्माण’ उपक्रम अंतर्गत बारमाही वृक्ष लागवड केली जाते. समाजातील विविध घटकांच्या सहयोगावर हा उपक्रम जोमाने सुरू आहे. यास सर्वोदय युवा स्पंदन लागवड केलेली झाड जगविली जातात व त्यावर अधिक भर असतो. आजतागायत लावलेली हजाराहून अधिक झाडे १० ते १५ फुटांपर्यंत व त्यापेक्षा अधिक वाढलेली असून डौलदार झालेली आहेत.

हरित निर्माण उपक्रमात वड, पिंपळ, औदुंबर, कडुलिंब, बेल, बकूळ व इतरही बरेच स्वदेशी प्रजातीतील वृक्ष प्रतिवर्षी लागवड केली जातात. हा उपक्रम शासनाच्या कुठल्याही मदतीविना तसेच अराजकीय स्वरूपात लोकसहभाग व समाजधुरीणांच्या मदतीवर शाश्वत स्वरूपात राबविला जात आहे, हे विशेष.

फोटो

Web Title: Tarunai Sakartey Smritivan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.