तरुणसागरजी महाराज यांनी दिली सर्वप्रथम ‘लोकमत’ला भेट : जळगावात सांगितला किस्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 05:37 PM2018-09-01T17:37:07+5:302018-09-01T17:43:28+5:30

‘लोकमत’बद्दल प्रेम

Tarunasagarji Maharaj first presented 'Lokmat | तरुणसागरजी महाराज यांनी दिली सर्वप्रथम ‘लोकमत’ला भेट : जळगावात सांगितला किस्सा

तरुणसागरजी महाराज यांनी दिली सर्वप्रथम ‘लोकमत’ला भेट : जळगावात सांगितला किस्सा

Next
ठळक मुद्देविविध विभागांची पाहणी‘लोकमत’चे केले वाचन

जळगाव : दीक्षा घेतल्यानंतर कोणत्याही संस्थेत गेलो नाही, मात्र ‘लोकमत’ही पहिलीच संस्था आहे, जेथे मी भेट दिली, अशा शब्दात क्रांतीकारी जैन संत प.पू. १०८ मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांनी ‘लोकमत’बद्दलचे प्रेम जळगावात व्यक्त व्यक्त केले होते.
प.पू. तरुणसागरजी महाराज यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या आठवणींना जळगावात उजाळा देण्यात आला. त्या वेळी ‘लोकमत’च्या भेटीचाही आवर्जून उल्लेख झाला. प.पू. तरुणसागरजी महाराज ७ ते १५ जून २००४ असे आठ दिवस जळगावात प्रवचनानिमित्त होते. त्या दरम्यान त्यांनी औद्योगिक वसाहतमधील ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली होती. या प्रसंगी त्यांच्यासोबत प.पू. १०८ प्रतीकसागरजी महाराज हेदेखील होते. मुनीश्रींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. या वेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, शाकाहार सदाचाराचे प्रणेता रतनलाल सी.बाफना, सुशील बाफना यांच्यासह ‘लोकमत’ परिवारातील सदस्य उपस्थित होते.
‘लोकमत’चे केले वाचन
विविध पुस्तकांचे लिखाण करणारे तरुणसागरजी महाराज यांना ‘लोकमत’ भेटीत ‘लोकमत’ हातात घेत त्यातील बातम्यांचे वाचन केले होते.
‘लोकमत’ची केली होती पाहणी
या भेटी दरम्यान प.पू. तरुणसागरजी महाराज यांनी ‘लोकमत कार्यालयात विविध विभागांना भेट देऊन संपूर्ण पाहणी केली व येथील माहिती जाणून घेतली. ‘लोकमत’च्या कार्याचे कौतुक केले. इतकेच नव्हे त्या वेळी त्यांनी सुरेशदादा जैन यांना सांगितले की, आजपर्यंत मी कोणत्याही संस्थेला भेट दिली नाही, मात्र ‘लोकमत’ही पहिलीच संस्था आहे, जेथे मी भेट दिली.

Web Title: Tarunasagarji Maharaj first presented 'Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.