वाट चुकलेल्या मुलीला टीसींच्या रूपात भेटले देवदूत, केले कुटुंबीयांच्या स्वाधीन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 06:07 PM2019-09-12T18:07:43+5:302019-09-12T18:12:42+5:30

बऱ्हाणपूर रेल्वे स्थानकावरून गर्दीमध्ये चुकून ताप्ती गंगा गाडी मध्ये स्वार झालेल्या दोन वर्षे चिमुकलीला कर्तव्यावर असणारे टीसी दादांनी माणूस की दाखवत भुसावळ स्थानकावर पालकाच्या स्वाधीन केले.

TC submits the missing girl to her family members | वाट चुकलेल्या मुलीला टीसींच्या रूपात भेटले देवदूत, केले कुटुंबीयांच्या स्वाधीन

वाट चुकलेल्या मुलीला टीसींच्या रूपात भेटले देवदूत, केले कुटुंबीयांच्या स्वाधीन

Next

भुसावळ - बऱ्हाणपूर रेल्वे स्थानकावरून गर्दीमध्ये चुकून ताप्ती गंगा गाडी मध्ये स्वार झालेल्या दोन वर्षे चिमुकलीला कर्तव्यावर असणारे टीसी दादांनी माणुसकी दाखवत भुसावळ स्थानकावर पालकाच्या स्वाधीन केले.

गाडी क्रमांक २२९४८  ताप्ती गंगा यावर कर्तव्यावर असणारे  उपतिकीट निरीक्षक अनिल सोनी व अजय खोसला हे गाडीचा कोच, क्रमांक  एस-४  ची तपासणी करत असताना दोन वर्षाची मुलगी बऱ्हाणपूर सुटल्यानंतर त्यांना दरवाज्याजवळ रडताना दिसली, मुलीस जवळ घेऊन तिला विचारणा करत असताना ती मुलगी सारखी रडत होती. संपूर्ण गाडीमध्ये प्रवाशांना मुलीची ओळख पटविण्याचा प्रयत्न , करत असताना  एका प्रवासी ने मुलीस ओळखले व सांगितले की ही मुलगी बऱ्हाणपूर वरून गाडीत चढली आहे क्षणाचाही विलंब न करता उपटिकट निरीक्षक अनिल सोनी व खोसला यांनी भुसावळ वाणिज्य नियंत्रकशी संपर्क साधला व घटनेची माहिती दिली व त्याच वेळेस बरानपुर रेल्वेस्थानकावर मुख्य तिकीट निरीक्षक शकील अहमद यांनाही भ्रमणध्वनीद्वारे चिमुकली ची माहिती देण्यात आली.

मुख्य तिकीट निरीक्षक शकील अहमद यांनी बऱ्हाणपूर रेल्वे स्थानकावर दोन वर्षाची मुलगी हरवल्याची उद्घोषणा केल्यानंतर भयभीत झालेले आई-वडील धावत जात शकील अहमद यांच्याकडे गेले व ती मुलगी आमचीच आहे, ती आता कुठे आहे? कशी गेली याबद्दल चौकशी करायला लागले तिकीट निरीक्षक अनिल सोनी यांनी व्हाट्सअप वर मुलीचा फोटो पाठवायला तसेच व्हिडिओ कॉल करून दोन वर्षे चिमुकली फातिमाचाच आहे ही खातर जमा झाली. 

बऱ्हाणपूर रेल्वे स्थानकावर मुलीची आई मुनिरा(२४)वडील फक्रुद्दीन तांबावाला (३०) रा. मुंबई हे गाडी क्रमांक ११०७२  कामायनी गाडीने मुंबईकडे जाण्याआधीच दोन वर्षांची  चिमुकली फातिमा ही खेळता खेळता ताप्ती गंगा गाडी मध्ये चढून गेली, होती.  फातिमा च्या पालकांनी  भुसावळ येथील त्यांचे नातेवाईक ताहीर भारमल यांना घटनेची माहिती सांगितली व चिमुकली फातिमा ताप्ती गंगा भुसावळ ला येत आहे तिला सांभाळा चे सांगितले. 

दरम्यान उप तिकीट निरीक्षक अनिल सोनी व खोसला यांनी चिमुकली फातीमाला रेल्वे सुरक्षा बलाचे हे. कॉ. जे एस पाटील आणि एन डी चौधरी यांच्या स्वाधीन करून त्यांना गाडीमधली हकीकत सांगितली  व भुसावळ येथील नातेवाईक ताहीर भारमल यांना  मुलीचे पालक भुसावळला येईपर्यंत तुम्ही रेल्वे सुरक्षा बलाचे  कर्मचारी सोबत राहण्याच्या सांगितले, 

दरम्यान बराणपुर ते भुसावळ दरम्यान दोंडाईच्या येथील प्रवास करणारे मुर्तुजा भाई यांनी चिमुकली फातिमा सा भुसावळ स्थानकापर्यंत सांभाळ केला. याकामी प्रवासी अब्बासी सज्जाद हुसेन नाशिक यांनीही ही मुलीची पालकांपर्यंत भेट करण्यासाठी सहकार्य केले.  टीसी दादांनी दाखवलेल्या माणुसकीच्या दर्शनामुळे रेल्वे स्थानकावर सर्वत्र कौतुक होते.
 

Web Title: TC submits the missing girl to her family members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.