चहा : अमृत की विष?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 04:02 PM2017-09-24T16:02:59+5:302017-09-24T16:03:10+5:30

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ.अलका शशांक कुलकर्णी यांनी ‘चहा’ या सदरात लिहिलेला लेख.

Tea: Elixir poison? | चहा : अमृत की विष?

चहा : अमृत की विष?

Next

चहा.. तपकिरी पानांचा, उकळत्या पाण्यात घालून तयार झालेला अर्क? छे, चहा तर स्वर्गीय दवबिंदू. अहो काहीतरीच काय? अहो, ह्या महाभयंकर पेयाचे सेवन स्त्रिया करणार? कुमागार्ला लागतील त्या ! मुळीच नाही बरं ! अहो चहा म्हणजे अमृत. नाही नाही, चहा तर साक्षात विष ! वाद अनेक.. वस्तुस्थिती ही की पाणी सोडल्यास चहा हे जगातले नंबर एकचे पेय आहे. ख्रिस्तपूर्व आठशे वर्षांपूर्वी लू यू या ऋषितुल्य माणसाने ‘चा चिंग (दि क्लासिक ऑफ टी) हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. 10 प्रकरणे असलेला हा लेख म्हणजे चहाबद्दलचे पहिले प्रमाण पुस्तक. जगातील गूढ एकतत्व आणि मिलाफाचे प्रतीक म्हणजे चहा असे त्यांचे प्रतिपादन होते. चहाबद्दलची मिथके, लागवडीवर भाष्य, चहा तयार करण्यासाठी लागणारी अवजारे, चहा करण्याच्या पद्धती, भांडी, अनेक बारीकसारीक बाबींबद्दल त्यांनी लिहिले. ‘तियानमेन’ ह्या त्यांच्या जन्मगावी आज त्यांचे स्मारक दिमाखात ऊभे आहे. आधुनिक संशोधनाने असे सिद्ध झाले आहे की प्रमाणात चहा पिणे हे आरोग्यदायी आहे. हृदयाचे काही आजार, काही कॅन्सर, मेंदूचे आजार--मिरगी, कंपवात, अल्झायमर आजार रोखण्यास चहा मदत करतो. उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाचे निवारण करण्यात चहाची मदत होते. इतकेच नाही तर हाडांची व दातांची मजबुती वाढण्यासही. चहा आपल्यास जागे राहण्यास मदत करतो, इतकेच नाही तर शरीर चेतावत दक्ष राहण्यास मदत करतो. उगीच नाही परीक्षेआधी विद्यार्थी चहा पीत! 1989 साली अमेरिकन संशोधनाने असे सिद्ध झाले आहे की कुठलाही जुनाट आजार चहापानामुळे होत नाही. थोडक्यात काय तर चहा आरोग्यदायी आहे! आपल्याला जी चहापत्ती मिळते, ती ताजी पाने आंबवून तयार होते. ताज्या पानातले किती घटक चहापत्तीत उरतात हे आंबवण्याची प्रक्रिया किती यावर अवलंबून असते. चहामध्ये खरे तर कॉफीपेक्षा जास्त कॅफेन असते, पण तो बनवण्याच्या पद्धतीमुळे एक कप चहामध्ये एक कप कॉफीपेक्षा ते कमी असते. सुरुवातीला चहा जरी शरीराला चेतावत असला तरी पुढचा कप शरीराला शांतता प्रदान करतो. कॉफी मधले कॅफेन चटकन रक्तात भिनते, मात्र चहातले कॅफेन हळुहळू रक्तात भिनते, म्हणून चहापासून मिळणारी उर्जा दीर्घकाळ टिकते, तर कॉफीतील थोडा वेळ. चहा शांतता प्रदान करणारा तर कॉफी निद्रानाश देणारी. चहापानामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल वाढते आणि हार्ट अटॅकचा धोका 11 कमी होतो, पण चहा पिणारे लोक थोडेच आरोग्याचा विचार करून चहा पितात? ते तर मानसिक समाधानासाठी चहा पितात. मूड सुधारण्यासाठी चहासारखे दुसरे पेय नाही. ह्या चहाने जगाला इतके वेड लावले की चहा प्राप्तीसाठी अनेक युद्धे झाली. चहापत्तीत चारशे तरी रासायनिक घटक असतात, पण त्यात तीन महत्त्वाचे असतात. पॉलिफीनॉल्स किंवा फ्लेविनॉईड्स (तुरट पण औषधीयुक्त), कॅफेन (चेतवणारे), आणि तैल घटक (स्वाद आणि गंध देणारे). ताज्या चहापत्तीत डझनभर तरी विटामीन्स असतात. तणावमुक्ती देणारे रिबोफ्लावीन आणि वाध्र्यक्याला काबूत ठेवणारी विटामीन्स सी आणि ई.

Web Title: Tea: Elixir poison?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.