दुचाकी खडीवर घसरल्याने शिक्षिका व मुलगा जागीच ठार; जळगावमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 01:06 PM2021-03-04T13:06:22+5:302021-03-04T13:16:53+5:30
ही घटना गुरुवारी सकाळी ९.१५ वाजता एरंडोल ते धारागीर दरम्यान घडली.
जळगाव : दुचाकीने चंदन बर्डी (जळू) येथे जिल्हा परिषद शाळेत जात असताना राष्ट्रीय महामार्गावर पसरलेल्या खडीवर दुचाकी घसरली. त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने शिक्षिका व तिचा मुलगा ठार झाले. ही घटना गुरुवारी सकाळी ९.१५ वाजता एरंडोल ते धारागीर दरम्यान घडली.
दुचाकीचालक शिक्षिका कविता कृष्णकांत चौधरी, (वय ३७ ) व मागे बसलेला त्यांचा मुलगा लावंण्य (वय १०) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
जळगाव : दुचाकीने चंदन बर्डी (जळू) येथे जिल्हा परिषद शाळेत जात असताना राष्ट्रीय महामार्गावर पसरलेल्या खडीवर दुचाकी घसरली. त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने शिक्षिका व तिचा मुलगा ठार झाले.
— Lokmat (@MiLOKMAT) March 4, 2021