एरंडोल येथे विहिरीच्या पाण्यात बुडून शिक्षकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 16:41 IST2020-08-21T16:41:08+5:302020-08-21T16:41:33+5:30

शिक्षक शीतलदास जीवन बडगुजर (४६) यांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Teacher dies after drowning in well water at Erandol | एरंडोल येथे विहिरीच्या पाण्यात बुडून शिक्षकाचा मृत्यू

एरंडोल येथे विहिरीच्या पाण्यात बुडून शिक्षकाचा मृत्यू

एरंडोल, जि.जळगाव : येथील पद्माई पार्कमधील रहिवासी तथा माध्यमिक शिक्षक शीतलदास जीवन बडगुजर (४६) यांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. २१ आॅगस्ट रोजी सकाळी साडेआठला घटना घडली.
ते रोजच्याप्रमाणे धरणगाव रस्त्याला सकाळी फिरायला गेलेले होते. रस्त्यालगतच्या माधव रामू पाटील यांच्या शेताच्या विहिरीत पाय धुण्यासाठी विहिरीजवळ गेले. तेथे पाय घसरून विहिरीत पडून त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दिनेश भास्कर बडगुजर यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिली. अनिल पाटील, किरण पाटील, नीलेश ब्राह्मणकर, सुनील लोहार पुढील तपास करीत आहेत.
शीतलदास बडगुजर हे पिंपळकोठा बुद्रूक येथील सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची १८ वर्षे सेवा झाली होती. गेल्या तीन वर्षांपासून त्यांची पिंपळकोठा येथे बदली झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Teacher dies after drowning in well water at Erandol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.