एअरबॅग उघडल्याने शिक्षक बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 11:51 PM2019-02-17T23:51:15+5:302019-02-17T23:51:33+5:30

पत्नी व आई जखमी

The teacher escaped by opening the airbag | एअरबॅग उघडल्याने शिक्षक बचावले

एअरबॅग उघडल्याने शिक्षक बचावले

Next

जळगाव : गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी जळगाव शहरात कुटुंबासह येत असलेल्या भडगाव येथील शिक्षकाच्या चारचाकीला भरधाव मिनिट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी सकाळी साडे अकरा वाजता शिरसोली रस्त्यावर घडली. यात कारमधील शिक्षकाची पत्नी व आई जखमी झाले असून एअरबॅग वेळीच उघडल्याने शिक्षक बचावले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
भडगाव तालुक्यातील गिरड येथील जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक पंकज गोविंदा पाटील (रा.पाचोरा) हे आई विजया पाटील व पत्नी माधुरी यांच्यासह रविवारी जळगावला नातेवाईकाकडे गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी कारने (क्र.एम.एच १९ सी.यू.६४२४) येत होते. शिरसोली रस्त्यावर सेंट टेरेसा शाळेजवळ जळगावकडून पाचोऱ्याकडे जात असलेल्या भरधाव मिनिट्रकने (क्र एम.एच.१९ बी.एम.२९९१) बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पंकज पाटील यांच्या चारचाकीला जोरदार धडक दिली. यात माधुरी पाटील यांना मुकाबार लागला आहे तर आई विजया पाटील यांच्या डाव्या हातास व पायास दुखापत झाली आहे. वेळीच एअरबॅग उघडल्यामुळे पंकज पाटील यांना कुठलाही इजा झाली नाही.
याप्रकरणी पंकज पाटील यांच्या फिर्यादीवरुन मिनि ट्रक चालकाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The teacher escaped by opening the airbag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव