नोकरी सोडण्यासाठी शिक्षिकेचा पतीकडूनच छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:16 AM2021-04-04T04:16:08+5:302021-04-04T04:16:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नोकरी सोडावी तसेच माहेरून दहा लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी पतीनेच शिक्षिकेचा छळ केल्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नोकरी सोडावी तसेच माहेरून दहा लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी पतीनेच शिक्षिकेचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्मिता उदय पाटील (रा.श्री अपार्टमेंट, पिंप्राळा शिवार) या शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह पाच जणांविरुद्ध शनिवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
स्मिता पाटील या शिक्षणसेवक म्हणून नोकरीला आहेत. त्यांनी नोकरी करावी हे पतीसह कुटुंबीयांना आवडत नाही. त्यांनी नोकरी सोडावी तसेच माहेराहून दहा लाख रुपये आणावे, यासाठी कुटुंबीयांकडून वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सासरच्यांनी अंगावरील दागिनेही काढून घेतल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
पती उदय रमेशराव पाटील, सासू कमलबाई पाटील (रा. अमळनेर), तारा दिगंबर पाटील (रा.शेंदुर्णी, ता.जामनेर) शरद रामराव साळुंखे व सुजित शरद साळुंखे (रा.मारवड, ता.अमळनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास महेंद्र पाटील हे करीत आहेत.