पहूर येथे शिक्षकाकडून वीस वर्षीय मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:27 PM2019-03-12T23:27:31+5:302019-03-12T23:27:39+5:30
शिक्षकाला अटक
पहूर, ता. जामनेर - येथील रहिवासी वीस वर्षीय तरूणीला पेठ मधील एका शिक्षकाने बळजबरीने प्रेम संबंध ठेवण्यासाठी भ्रमध्वनीवर मागणी केले तसेच तुझे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी पहूर पोलिसात शाहरूख मशीद तडवी (२५) या शिक्षकाविरूध्द अत्याचार व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. याघटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहूर पेठ खाँजानगर मधील रहिवासी शाहरूख मशीद तडवी याने ७ मार्च रोजी पीडित मुलीला भ्रमध्वनीवर संवाद साधत प्रेम संबंध ठेवण्यासाठी मागणी केली. जर तू माझ्याशी प्रेम संबंध ठेवले नाही तर मी तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तुला बदनाम करीन अशी धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याचे उघडकीस आले. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री शिक्षक शाहरूख मशीद तडवी याच्या विरुद्ध भादंवि ३५४ ड, ३४१, ५०६ व ५०७ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तपास पो.काँ.किरण शिंपी करीत आहेत.