१२ लाखाचा गंडा घालणाऱ्या शिक्षकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:08 PM2019-03-04T12:08:55+5:302019-03-04T12:10:50+5:30

नोकरीचे दिले होते अमिष

A teacher who loses 12 lacs is arrested | १२ लाखाचा गंडा घालणाऱ्या शिक्षकाला अटक

१२ लाखाचा गंडा घालणाऱ्या शिक्षकाला अटक

Next


जळगाव : वन विभागात मुलाला नोकरी लावून देतो असे सांगून दिलीप अर्जुन पगारे (रा.बहाळ, ता. चाळीसगाव) यांना १२ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या गणेश ज्ञानेश्वर पाटील ३६, रा. पिंपळगाव माळवी, ता.जि. अहमदनगर या शिक्षकाला त्याच्या मूळ गावाहून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. गणेश याने चाळीसगाव तालुक्यात अनेकांना गंडा घातला आहे.
दिलीप पगारे यांच्या मुलाला वन विभागात गार्ड म्हणून नोकरी लावून देण्यासाठी गणेश याने १२ लाख तर त्याच्या आणखी काही मित्रांकडून ६ जानेवारी २०१४ रोजी पैसे घेतले होते. त्याने नोकरीही लावली नाही आणि पैसेही परत केले नाही म्हणून दिलीप पगारे यांनी मेहुणबारे पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक बी.जी. रोहोम यांनी हे.कॉ.अनिल इंगळे, सुरेश महाजन, संतोष मायकल, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, सचिन महाजन व दर्शन ढाकणे यांचे एक पथक गणेश याच्या मुळ गावी पाठविले होते. या पथकाने त्याला शनिवारी गावातूनच ताब्यात घेतले. गणेश हा उच्च शिक्षित असून मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

Web Title: A teacher who loses 12 lacs is arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.