मुलाला भेटायला चाललेल्या शिक्षकाचा रस्त्यातच अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 09:28 PM2019-09-01T21:28:06+5:302019-09-01T21:30:29+5:30

कसारा स्टेशनवरील घटना : चुंचाळेतील सूरज शिंदे यांना आला हृदयविकाराचा झटका

The teacher who met the child ended up in the street | मुलाला भेटायला चाललेल्या शिक्षकाचा रस्त्यातच अंत

मुलाला भेटायला चाललेल्या शिक्षकाचा रस्त्यातच अंत

Next



चोपडा : मुलाला भेटण्यासाठी पनवेल येथे जात असताना तालुक्यातील चुंचाळे येथील शिक्षकाचा रस्त्यातच हृदयविकाराच्या धक्कयाने ३१ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला.
चुंचाळे येथील रहिवासी व जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा लासूर येथील शिक्षक सूरज काशिनाथ शिंदे शनिवारी पनवेल येथे इंजिनिअरिंग शिकत असलेल्या मुलाला भेटण्यासाठी जात होते. दरम्यान, नाशिक येथे बंधू रविराज शिंदे यांची भेट घेऊन ते कसारा रेल्वे स्टेशनवर पोहोचले. तेथून लोकलने ते पनवेलला जाणार होते. पण अचानक कसारा रेल्वे स्टेशन परिसरात भोवळ येऊन ते रस्त्यावर कोसळले. स्थानिक प्रवासी व पोलिसांच्या मदतीने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांचा तेथेच दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांनी त्यांचे बंधू रविराज शिंदे यांच्याशी संपर्क साधला. रविवारी कसारा रुग्णालयात शवविच्छेदनची सोय नसल्यामुळे त्यांचे मृतदेह शहापूर, जि.ठाणे येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
रविवारी रात्री उशिरा चुंचाळे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा लासूर येथील उपशिक्षीका सरला शिंदे यांचे ते पती होत.

 

 

Web Title: The teacher who met the child ended up in the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.