निवडणूक प्रशिक्षण घेऊन परतणाऱ्या शिक्षकाचा जळगावात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 07:19 AM2019-04-13T07:19:31+5:302019-04-13T07:38:32+5:30
निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम आटोपून परतीच्या मार्गावर निघालेल्या जामनेर येथील शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्कयाने मृत्यू झाला. ही घटना नवीन बसस्थानकावर शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली.
जळगाव : निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम आटोपून परतीच्या मार्गावर निघालेल्या जामनेर येथील शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्कयाने मृत्यू झाला. ही घटना नवीन बसस्थानकावर शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली. रामदास माणिक जाधव (५१, रा़ आयटीआय कॉलनी, जामनेर) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
जाधव हे सकाळी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जळगावात आले होते. सायंकाळी प्रशिक्षण आटोपल्यानंतर ते जामनेरला जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आले. साडेसात वाजेच्या सुमारास त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले.
तिथे असलेले पो कॉ राजेश मेढे व शेखर जोशी यांनी जाधव यांना जिल्हा रूग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जामनेरात जाधव हे एकटेच राहत होते. त्यांचे कुटुंबीय नगर येथे वास्तव्याला असल्याची माहिती शेजा-यांकडून मिळाली.