शासन निर्णयाविरोधात शिक्षक-शिक्षकेतर संपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 02:37 PM2020-12-18T14:37:42+5:302020-12-18T14:56:30+5:30
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात होणाऱ्या शाळा बंद आंदोलनात महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी संघटना पाचोरा तालुका संपात सहभागी असल्याचे निवेदन तहसीलदार कैलास चावडे यांना दिले.
Next
प चोरा : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात होणाऱ्या शाळा बंद आंदोलनास महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी संघटना पाचोरा तालुका संपात सहभागी असल्याचे निवेदन तहसीलदार कैलास चावडे यांना दिले.यावेळी उपस्थित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून या शासन निर्णयाचा निषेध केला. यावेळी सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सकाळी तहसीलदार कार्यालयात एकत्र येऊन काळी फित लावून राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ११ डिसेंबर २०२० राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी पद रद्द कारण्याबत काढलेला शासन निर्णय हा अतिशय अन्यायकारक असून या शासन निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध होत असून ,प्रत्येक शाळेत शिपाई असणे गरजेचे आहे, असे मत यावेळी व्यक्त केले.यावेळी पाचोरा तालुकाध्यक्ष रामदास दाभाडे, सचिव जगन्नाथ निकम, सहसचिव धनराज सोनवणे, अजय शिनकर, बबनराव पाटील, श्रीकांत अहिरे, सागर अहिरे, संजय पाटील, विजय पाटील, जनार्दन माळी, विजय महाजन, सागर महाजन, नाना साळवे, चंद्रभान पाटील, पवन घोरपडे, सुनील माळी, आंबाजी पाटील, आबा सोनवणे, कैलास राठोड, हिरालाल परदेशी, राजेंद्र मराठे, शकील खाटिक, संजय वाघ, धनराज धनगर, शिवराम पाटील, ईलियास मलिक, पिंजारी एजाज खान, शेख सत्तार, जुम्माखान रंगरेज, राजाराम पाटील, लखन पाटील, नारायण पाटील, गुलाब पाटील, संजय गायकवाड, बी.पी.पगार, सुनील गुजर, रवींद्र पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळा बंद आंदोलनास पी.टी.सी.चा पाठिंबाशाळा बंद आंदोलनास पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेने पाठिंबा दिला असून संस्थेच्या गो.से.हायस्कूलच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून या शासन निर्णयाचा निषेध केला. संस्थाचालकांना शाळा बंद आंदोलनाला पाठिंबा देणारे निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर.एल. पाटील, एन.आर.पाटील, ए. बी. अहिरे, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, टेक्निकल विभागप्रमुख शरद पाटील यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.