तोंडापूर येथे गांधी जयंती कार्यक्रमास शिक्षकांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 07:45 PM2018-10-02T19:45:51+5:302018-10-02T19:47:03+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळेत गांधी जयंतीच्या कार्यक्रमाला शिक्षकांनीच दांडी मारल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला.
तोंडापूर, ता.जामनेर, जि.जळगाव : जिल्हा परिषदेच्या येथील शाळेत गांधी जयंतीच्या कार्यक्रमाला शिक्षकांनीच दांडी मारल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला.
प्रभारी सरपंच हमीद शेख यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्रारंभी गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. पहिली ते चौथीपर्यंतचे आठ वर्ग असलेल्या या शाळेत ३३० पटसंख्या आहे. शाळेत एकूण नऊ शिक्षक आहेत. गांधी जयंतीच्या कार्यक्रमाला मात्र केवळ स्थानिक दोनच शिक्षक हजर होते. उर्वरित शिक्षक परिसरातून अप-डाऊन करतात. शिक्षकांच्या गैरहजेरीबाबत उपस्थित पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
‘मी पालक म्हणून गांधीजयंतीला शाळेत हजर होतो. मात्र तिथे स्थानिक दोन दोन शिक्षक हजर होते. बाकी सात शिक्षक उपस्थित नव्हते’, असे पालक भीमराव लक्ष्मण रावते यांनी सांगितले.
‘महात्मा गांधी जयंतीला सर्व शिक्षक हजर राहणे आवश्यक असते. जे शिक्षक शाळेत हजर नसतील त्यांना कारणे विचारली जातील’, असे शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू काळे यांनी सांगितले.