विद्यार्थींच्या संर्पकात आल्यामुळे शिक्षकांना कोरोनाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:15 AM2021-02-07T04:15:44+5:302021-02-07T04:15:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील एक शिक्षक दाम्पत्य कोरोना बाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात अनेक शिक्षक लक्षणे असूनही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील एक शिक्षक दाम्पत्य कोरोना बाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात अनेक शिक्षक लक्षणे असूनही पुढे येत नसून त्यांना कोरोनाची भीती असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक पातळ्यांवर खरच नियम पाळले जात आहेत का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्या आधी शिक्षकांच्या चाचण्या करण्यात आल्या मात्र, आधीच चाचण्या झाल्या असल्याने आता अनेक शिक्षकांच्या चाचण्या झालेल्या नाहीत. उर्वरित शिक्षकांच्या चाचण्या करण्यात आल्या. मात्र, काही शिक्षक नंतर तपासणी केल्यानंतर बाधित आढळून आले. यात नियमीत तपासणी दोन तर नंतर एक दाम्पत्य बाधित आढळून आले होते. त्यामुळे ही बाब गांभिर्याने घेतली जावी, असेही बोलले जात आहे. लहान विद्यार्थी शाळांमध्ये कितपत नियम पाळत असतील, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
शाळांमध्ये चाळीस टक्के विद्यार्थी मास्कविना असतात, नियम कितपत पाळणार आहे. शेवटी ते लहान विद्यार्थी, अनेक शिक्षक भीतीपोटी समोर येत नाही, शासनाने किती शिक्षक बाधित हे जाहीर करावे, अन्यथा यातून संसर्ग वाढेल- एक शिक्षक