जळगावातील शिक्षकांच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:18 AM2021-07-29T04:18:22+5:302021-07-29T04:18:22+5:30
फोटो - २९ सीटीआर ५४ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : न्यायालयीन कामकाज आटोपून औरंगाबादकडून जळगावकडे निघालेल्या शिक्षकांच्या वाहनाचे टायर ...
फोटो - २९ सीटीआर ५४
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : न्यायालयीन कामकाज आटोपून औरंगाबादकडून जळगावकडे निघालेल्या शिक्षकांच्या वाहनाचे टायर फुटल्याने अपघात झाला. ही घटना बुधवारी दुपारी ४़ ३० वाजेच्या सुमारास औरंगाबादजवळील चौका गावाजवळ घडली. अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यात एक केंद्रप्रमुख व चार शिक्षकांचा समावेश आहे.
भोकर केंद्राचे केंद्र प्रमुख युवराज परदेशी यांच्यासह पदवीधर शिक्षक बाबुलाल तायडे, मनोज माळी, उखर्डू चव्हाण, राजेश जोशी यांनी औरंगाबाद न्यायालयात पदवीधर वेतनश्रेणी फरक मिळण्यासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या न्यायालयीन कामकाजासाठी पाचही जण चारचाकी वाहनाने (क्र.एमएच.१९.बीयू.१९७७) शुक्रवारी औरंगाबाद येथे गेले होते. दुपारी न्यायालयीन कामकाज आटोपून जळगावकडे निघाल्यानंतर औरंगाबादजवळील चौका गावानजीक वाहनाचे अचानक टायर फुटले. टायर फुटताच, वाहनाने दोन ते तीन पलट्या घेतल्या. सुदैवाने, वाहनातील पाचही जणांना गंभीर दुखापत झाली नाही. अपघातानंतर जवळच असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. त्यानंतर जखमींना वाहनातून बाहेर काढून उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.