गुणविभागणीसंदर्भात शिक्षकांचे आजपासून तालुकास्तरीय प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 09:35 PM2019-09-23T21:35:15+5:302019-09-23T21:35:38+5:30
सहा तज्ञ करणार मार्गदर्शन: जिल्हाभरात ११ केंद्र
जळगाव : सुधारीत मूल्यमापन आराखडे व घटकनिहाय गुणविभागणी संदर्भात विषय शिक्षकांचे तालुकास्तरावर २४ ते २७ सप्टेंबर दरम्यान, प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे़ इयत्ता नववी व दहावीच्या शिक्षकांसाठी तालुकास्तरावर तर अकरावी व बारावीच्या शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे़
या ठिकाणी होणार प्रशिक्षण
अमळनेर येथील प्रताप हायस्कूल व जीएस हायस्कूल, भुसावळ बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यांचे भुसावळ येथील डी़ एल़ हिंदी हायस्कूलव श्री संत गाडगेबाबा महाविद्याल, चाळीसगाव व भडगाव तालुक्यांचे भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर महाविद्याल चाळीसगाव व जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चाळीसगाव, चोपडा तालुक्याचे पंकज विद्यालय व प्रताप विद्यामंदिर, जळगाव ग्रामीण व धरणगाव तालुक्याचे महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जळगाव, जळगाव शहर स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय कुसुंबा, जामनेर व एरंडोल तालुक्यांचे ए़टी़झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव, पारोळा तालुक्याचे माध्यमिक विद्यामंदिर व्यंकटेश नगर पारोळा, माध्यमिक विद्यामंदिर पारोळा, पाचोरा तालुक्याचे गो़ से हायस्कूल व के़ पी़ शिंदे माध्यमिक विद्यालय, रावेर तालुक्याचे मॉडर्न इंग्लिश स्कूल व स्वामी नारायण गुरूकूल सावदा तर यावल तालुक्याचे श़ स़ चौधरी विद्यालय यावल व साने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल या ठिकाणी हे शिबिर विषयानुसार वेगवेगळ्या तारखांना होणार आहे़
सर्व तुकड्या धरून एका विषयाला पाच शिक्षक असल्यास एका शिक्षकांना व पाचपेक्षा अधिक असल्यास दोन शिक्षकांना प्रशिक्षणासाठी बोलविण्यात येणार आहे़ एका केंद्रावर पाच तज्ञांसह ७१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अपेक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली़