केरळ पुरग्रस्तांना मदतीस जामनेरातील शिक्षकांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 04:42 PM2018-09-04T16:42:54+5:302018-09-04T16:45:00+5:30
केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून राज्य शासनाने कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र तालुक्यातील जुनी पेन्शन हक्क संघटनचे सुमारे ३५० शिक्षकांनी ही मदत देण्यासाठी नकार दिला आहे.
जामनेर : केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून राज्य शासनाने कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र तालुक्यातील जुनी पेन्शन हक्क संघटनचे सुमारे ३५० शिक्षकांनी ही मदत देण्यासाठी नकार दिला आहे. आपले एक दिवसाचे वेतन कपात करू नये असे लेखी पत्र या शिक्षक कर्मचाºयांनी पंचायत समितीचे साहाय्यक कार्यालय प्रमुख रामदास कपले यांना दिले आहे.
यावेळी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष सोपान पारधी, शेखर महाजन, विलास बोरसे, ज्ञानदेव गोपाळ, शेख इकबाल, मुजीबुर रहमान, उमाकांत तळेले, उमेश देशमुख, राजेंद्र महाजन, योगेश मानकर, छोटु वाघ, अमित मुंठे, दीपक पटवर्धन, अशोक साळुंखे, तुकाराम राठोड, गोविंदा ठाकरे, गणेश राऊत, धनराज वराडे , रूपेश घुले, देवीदास पाटील, दीपक कांबळे यांच्यासह शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.