सीएमपी प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:11 AM2021-06-23T04:11:58+5:302021-06-23T04:11:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सीएमपी प्रणालीद्वारे जळगाव जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला राष्ट्रीयकृत बँकेतून व्हावेत, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सीएमपी प्रणालीद्वारे जळगाव जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला राष्ट्रीयकृत बँकेतून व्हावेत, अशी मागणी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या वेतनासाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण दाखवून संबंधित शिक्षकांच्या वेतनास सातत्याने विलंब होत आहे. त्यामुळे विमा व गृहकर्ज हप्ते भरण्यास विलंब होत असून अतिरिक्त दंडाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच निधी उपलब्ध झाला तरी जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे शिक्षक वेतनापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्याच्या धर्तीवर सीएमपी प्रणालीद्वारे जळगावातील शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला राष्ट्रीयकृत बँकेतून मिळावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देताना जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.अतुल इंगळे, प्रा. उत्तमराव सुरवाडे, प्रा.अनिलराव वाघ आदींची उपस्थिती आहे.