ज्ञानातूनच मानवतेची शिकवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 02:19 PM2019-08-12T14:19:13+5:302019-08-12T14:19:48+5:30

परमात्म्याचे ज्ञानच मानवतेचा खरा धडा शिकवते आणि केवळ विशाल हृदयासोबत मानवता स्थिर व सुरक्षित राहू शकते. छोट्या छोट्या गोष्टींवर ...

The teaching of humanity through knowledge | ज्ञानातूनच मानवतेची शिकवण

ज्ञानातूनच मानवतेची शिकवण

Next

परमात्म्याचे ज्ञानच मानवतेचा खरा धडा शिकवते आणि केवळ विशाल हृदयासोबत मानवता स्थिर व सुरक्षित राहू शकते. छोट्या छोट्या गोष्टींवर क्रोध करणे, मनामध्ये व्देष निर्माण करणे यामुळे मनुष्याचे नुकसान आहे. जसे की, एखादा खेळ खेळण्यासाठी आधी सराव करणे गरजेचे आहे. तरच खेळ चांगल्या तºहेने खेळू शकू. त्याचप्रमाणे अध्यात्म आपल्या जीवनाचा भाग बनेल. तेव्हाच याला व्यवहारात येणारी अध्यात्मिकता म्हणू शकतो.
आपणा सर्वांच्या जीवनाचे उद्दीष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न पाहून प्रसन्नता होत आहे. जेव्हा समाजाकडे पाहतो, तेव्हा हीच प्रार्थना येते की, हे प्रभू, मनुष्याचे तन तर दिले आहे; परंतु जीवनदेखील मनुष्यासारखे होऊ देत. ज्याप्रमाणे ऋतु बदलत असतात, त्याचप्रमाणे जीवनात सुख-दु:ख येतात; परंतु जे परमात्म्याच्या नावात रंगलेले आहेत, ते निरंकाराच्या जाणिवेत जीवन जगून सदैव कृतज्ञतेचा भाव व्यतीत करतात. अनेक जण एखादे संकट किवा दु:खसुध्दा ईश्वराची इच्छा समजतात. हा जो निरंकार कणाकणात सामावलेला आहे, याला सहजरुपात प्राप्त करतात. कारण ते निरंकाराशी जुळून राहतात. ज्याप्रमाणे तबला, ढोलकी इतर वाद्ये दिसण्यामध्ये वेगळी असतात; परंतु जे स्वर निघतात, ते एकसारखेच असतात. याचप्रमाणे संतदेखील विविध रुपात भक्ती करतात; परंतु त्याचा भाव एकच असतो.
दैनंदिन जीवनातील जबाबदारीचे आपण रोजच पालन करतो. यासोबतच जर अध्यात्माला आपल्या जीवनाचा आधार बनवले, तर मुक्ती प्राप्त होईल. तिथेच सहज अवस्थेचीही प्राप्ती होईल.
आजच्या तांत्रिक युगात ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला वस्तूंचा सदुपयोग कशाप्रकारे करावा, हेदेखील दर्शविते. आपण वस्तूंचा उपयोग चांगल्या कामासाठीच करावा ना की, कोणाला दु:ख किंवा कोणाचे नुकसान करण्यासाठी असावा.
चाकूचा उपयोग डॉक्टर आणि खुनी दोघेही करतात. एक कोणाला तरी जीवनदान देतो आणि दुसरा कोणाचे तरी जीवन समाप्त करतो.
( संकलन - राजकुमार वाणी)

Web Title: The teaching of humanity through knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.