परमात्म्याच्या ज्ञानातूनच मानवतेची शिकवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 11:23 PM2019-08-11T23:23:27+5:302019-08-11T23:23:56+5:30
परमात्म्याचे ज्ञानच मानवतेचा खरा धडा शिकवते आणि केवळ विशाल हृदयासोबत मानवता स्थिर व सुरक्षित राहू शकते. छोट्या छोट्या गोष्टींवर ...
परमात्म्याचे ज्ञानच मानवतेचा खरा धडा शिकवते आणि केवळ विशाल हृदयासोबत मानवता स्थिर व सुरक्षित राहू शकते. छोट्या छोट्या गोष्टींवर क्रोध करणे, मनामध्ये व्देष निर्माण करणे याने मनुष्याचे नुकसान आहे. जसे की, एखादा खेळ खेळण्यासाठी आधी सराव करणे गरजेचे आहे. तरच खेळ चांगल्या तºहेने खेळू शकू. तव्दतच गुरमत आपल्या जीवनाचा भाग बनेल. तेव्हाच याला व्यवहारात येणारी अध्यात्मिकता म्हणू शकतो.
आपणा सर्वांच्या जीवनाचे उद्दीष्ट जाणून घेण्याच्या या उत्साहाला पाहून प्रसन्नता होत आहे. जेव्हा समाजाकडे पाहतो, तेव्हा हीच प्रार्थना येते की, हे प्रभू, मनुष्याचे तन तर दिले आहे; परंतु जीवनदेखील मनुष्यासारखे होऊ देत. ज्याप्रमाणे ऋतु बदलत असतात, त्याचप्रमाणे जीवनात सुख-दु:ख येतात; परंतु जे परमात्म्याच्या नावात रंगलेले आहेत, ते निरंकाराच्या जाणिवेत जीवन जगून सदैव कृतज्ञतेचा भाव व्यतित करतात. असे गुरसिख एखादे संकट किवा दु:खसुध्दा ईश्वराची इच्छा समजतात. हा जो निरंकार कणाकणात सामावलेला आहे, याला सहजरुपात प्राप्त करतात. कारण ते निरंकाराशी जुडून राहतात. ज्याप्रमाणे तबला, ढोलकी इतर वाद्ये दिसण्यामध्ये वेगळी असतात; परंतु जे स्वर निघतात, ते एकसारखेच असतात. याचप्रमाणे संतदेखील विविध रुपात भक्ती करतात; परंतु भाव एक त्याचाच असतो.
आपल्या दैनंदिन जीवनातील जबाबदारीचे आपण रोजच पालन करतो. यासोबतच जर अध्यात्माला आपल्या जीवनाचा आधार बनवले, तर मुक्ती प्राप्त होईल. तिथेच सहज अवस्थेचीही प्राप्ती होईल. आजच्या तांत्रिक युगात ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला वस्तूंचा सदुपयोग कशाप्रकारे करावा, हेदेखील दर्शविते. आपण वस्तूंचा उपयोग चांगल्या कामासाठीच करावा ना की, कोणाला दु:ख किंवा कोणाचे नुकसान करण्यासाठी असावा.
सुरीचा उपयोग डॉक्टर आणि खुनी दोघेही करतात. एक कोणाला तरी जीवनदान देतो आणि दुसरा कोणाचे तरी जीवन समाप्त करतो.
- सद््््गुरु सुदीक्षाजी
(संकलन - राजकुमार वाणी)