मानवतेची शिकवण, विश्वशांतीचा संदेश देणारा बौद्ध धम्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 01:44 AM2019-05-19T01:44:55+5:302019-05-19T01:45:30+5:30

संपूर्ण विश्वामध्ये भारताची उंच मान

The teachings of humanity, Buddhist Dhamma that conveys world peace | मानवतेची शिकवण, विश्वशांतीचा संदेश देणारा बौद्ध धम्म

मानवतेची शिकवण, विश्वशांतीचा संदेश देणारा बौद्ध धम्म

googlenewsNext

संपूर्ण विश्वामध्ये भारताची उंच मान आहे. ती फक्त बौद्ध विचारामुळे येथील शांती, अहिंसा, न्याय, शील, प्रज्ञा या सगळ्यामुळे बौद्ध धर्म श्रेष्ठ आहे. संघमित्रा आणि महेंद्र ही सम्राट अशोकाची मुलं त्यांनी संपूर्ण जगात धम्म प्रसारचे कार्य केले. भगवान गौतम बुद्धांनी बहुजन समाजाच्या हितासाठी बौद्ध धम्माची स्थापना केली. तो मानवतावादी आहे. बौद्धधम्म हा संपूर्ण विज्ञानावर आधारीत आहे. त्याला एक जीवन पद्धती आहे. बौद्ध धम्म समानता, न्याय, एकता, राष्टÑीयता, स्वातंत्र्यता, करूणा, मैत्री, विश्वबंधूता आहे. मानवाला मानसिक गुलामीतून मुक्त करणारा मार्ग बुद्धाने दिला. बुद्धाने बुद्ध धम्माला पारखण्यासाठी एक कसोटी केली आहे. ती अन्य कुठही मिळणार नाही. ते म्हणतात.
एखाद्या गोष्टीला मानायचे नाही, त्याला खूप लोक मानतात. एखाद्या गोष्टीला मानायचे नाही कारण त्याला साधू, संत, ब्राह्मण आचार्य इ. पूज्य व्यक्ती मानतात. एखाद्या गोष्टीला मानायचे नाही कारण आपले पूर्वज मानतात. आपल्या विवेकाला कसून त्याची तपासणी करा. आपल्या अनुभूतीवर उतरले का ते पहा नंतरच त्याचा स्वीकार करा. ती गोष्टी तर्कसंगत, बौद्धीसंगत, विज्ञानसंगत, न्यायसंगत आणि बहुजनांच्या हिताची असेल तरच त्याचा स्वीकार करा. ज्याप्रमाणे सोनार सोन तापवून तापवून आपल्या कसोटीवर सोन पारखतो, त्या प्रमाणे याही सोन्याला पारखा असा बुद्धाचा साधा सोपा स्पष्ट धम्म आहे. त्याच कुठेही अंधश्रद्धा नाही. धम्माची संपूर्ण मांडणी ही कृती आणि वाचेतून अहिंसेवर आधारीत आहे. अहिंसा त्याची मुख्य शिकवण आहे.
बौद्ध कालिण कौशल देशाची राजधानी वैशाली आणि तिचा राजा प्रसेनजीत हा अतिषय हुशार आणि भाग्यशाली होता, कारण त्याने अनेकदा बुद्धाचे प्रवचन ऐकले होते. प्रसेनजीतची राणी मल्लीका ही अतिश बौद्ध धम्माची निष्ठावान आणि अभ्यासू अशी होती. ती अहिंसावादी होती. एकदा प्रसेनजीत राज्याला एका ब्राह्मण पुरोहिताने सल्ला दिला की, त्याच्या राज्यावरती जे संकट आले ने नष्ट करण्यासाठी हजार पशुंचा बळी देणे अनिवार्य आहे.
राजा हा संकल्प मनाला आणि कृतीत आणायला तयार झाला. तेव्हा राणीने राजाला पशुबळी देण्यापासून परावृत्त केले. अशा प्रकारे बळी दिल्या जाणारे प्राण्यांचे जीवन वाचविले होते. राणी वरती बौद्ध धम्मातील अहिंसा या तत्वाचा मोठा पगडा होता. ती स्वत: निर्णय घेणारी होती व ती स्वतंत्र विचाराची होती.
मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. हे राणीचे निर्णयात्मक कर्तव्य अहिंसेच्या मार्गावरती वाटचाल करणारे आहे. कोणाची हिंसा करून नये, किंवा करवून घेवू नये, असे कृत्य करणाऱ्यांचे समर्थन करू नये. प्राणी हत्या करू नये, तो बलवान असो वा निर्बल एखादी व्यक्ती शंभर वर्षे आपले सर्वस्व सर्व देवतांना बळी अर्पणसाठी केंद्रीत करीत असेल तर त्या व्यक्तीची तुलना अशा व्यक्तीशी करू शकत नाही.
- सरोजिनी गांजरे- लभाणे, जळगाव

Web Title: The teachings of humanity, Buddhist Dhamma that conveys world peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.