‘आयएमआर’ च्या संघाने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:08 AM2019-02-08T11:08:47+5:302019-02-08T11:08:55+5:30

आंतरराष्ट्रीय नियोजन स्पर्धा

The team of 'IMR' | ‘आयएमआर’ च्या संघाने मारली बाजी

‘आयएमआर’ च्या संघाने मारली बाजी

Next
ठळक मुद्दे प्लॅस्टिक, मातीच्या खडकापासून बनविले पेव्हरब्लॉक

जळगाव : केरळमधील आयआयएम कोझिकोड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय व्यवसाय नियोजन स्पर्धेत देशभरातील ६६ संघांनी सहभाग घेतला होता. त्यात जळगावच्या केसीई संस्थेच्या आयएमआर महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. २५ हजारांचा धनादेश् आणि ट्रॉफी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या विजेत्या संघाला आशियाई स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होणार आहे.
देशभरात विविध ठिकाणी गेल्या सहा वषार्पासून ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. आयएमआर महाविद्यालय ५ वर्षा सहभाग घेत आहे. यात यापूर्वी द्वितीय, तृतीय आणि विशेष सहभागाने आयएमआर महाविद्यालयाचा गौरव झाला आहे.
दरम्यान, २ ते ३ फेबु्रवारी रोजी केरळमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय नियोजन स्पर्धेत गोरखपूर, कोलकाता, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली आदी मोठ्या संस्थांच्या विद्यार्थ्यांचे संघ स्पर्धेत उतरले होते़ अशा दिग्गजांच्या संघासमोरआयएमआर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्लासोल या प्रकल्पाचे सादरीकरण केले.
यात पेव्हरब्लॉकमध्ये सिमेंटचा वापर न करता प्लास्टिक आणि मातीच्या खडकांचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक दाखविले.
यामुळे निसर्गाचे संतुलन टिकून राहण्यास काही अंशी मदत होते आणि घातक प्लास्टिकचा पुनर्वापर आणि आग प्रतीबंधकतादेखील कशी होते याचे नियोजन कौशल्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांनी सादर केले. या प्रकल्पाला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला.
या विद्यार्थ्यांचा होता संघात सहभाग...
विजेत्या संघात एमबीए अभ्यासक्रमाचे आकांक्षा जैन, सुरेंद्र सैनी, काव्या बेदमुथा, विशाल व्यास, हर्ष संचेती यांचा समावेश होता. यासह एका विशेष स्पर्धेतही काव्या बेदमुथा आणि विशाल व्यास यांनी तृतीय पारितोषिक मिळविले. त्यांना प्रा. डॉ.पराग नारखेडे, प्रा.डॉ.शुभदा कुलकर्णी, प्रा.ममता दहाड यांनी मार्गदर्शन लाभले़ विद्यार्थ्यांचे केसीई संस्थाध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, आयएमआर महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शिल्पा बेंडाळे, एमबीए विभागप्रमुख प्रा.विशाल संदानशिव यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: The team of 'IMR'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.