कांद्याने आणले उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू

By admin | Published: March 26, 2017 06:15 PM2017-03-26T18:15:18+5:302017-03-26T18:15:18+5:30

चोपडा तालुक्यातील अडावद परिसर हा कांदा उत्पादनाचे आगार म्हणून ओळखला जातो. मात्र कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने, उत्पादक हतबल झालेला आहे.

Tears in the eyes of growers brought onion | कांद्याने आणले उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू

कांद्याने आणले उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू

Next

 उत्पन्नापेक्षा जादा खर्च  : किमान 500 रूपये मण भाव अपेक्षित

चोपडा, दि.26-कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या चोपडा तालुक्यात शेतक:यांना कांद्याला भाव मिळत नसल्याने हतबल झाले आहे. 1 मण (40किलो)साठी 500 रुपये भाव मिळावा अशी मागणी शेतक:यांकडून होत आहे.
 चोपडा तालुक्यातील अडावद परिसर हा कांदा उत्पादनाचे आगार म्हणून ओळखला जातो. येथे उत्पादीत होणारा कांदा देशाच्या कानाकोप:यात पाठविला जातो. लासलगावच्या खालोखाल येथे कांदा विकला जातो. मात्र कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने, उत्पादक हतबल झालेला आहे. कांद्याला हमी भाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चोपडा तालुक्यात  पावसाळ्यात पोळ कांदा सुमारे 400  हेक्टर, हिवाळी कांदा 2000 हेक्टर, तर उन्हाळी रांगडा कांदा 600 हेक्टर क्षेत्रावर लागवड केला जातो. यात सर्वात जास्त अडावद परिसरात तिन्ही हंगामात तालुक्यातील एकूण 80 टक्के कांदा  अडावद परिसरात पिकविला जातो.
प्रमुख बाजारपेठांमधून मागणी नाही
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडावद उपबाजारात विक्रीस येणारा कांदा देशभरात दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, बिहार, ओरिसा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश,  छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, तेलंगणा व केरळ या राज्यांमधील प्रमुख शहरातील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी जातो. मात्र तेथून होणा:या मागणीत घट असल्याने देशभरातील वितरण व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. म्हणून शेतक:यांना अपेक्षित भाव मिळत नाही.
  डिङोलच्या भाव वाढीचा परिणाम
    चलनातील 500 व 1000 रुपयांची नोटबंदी झाल्यापासून आतापयर्ंत तीन ते चार वेळा डिङोलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे मालवाहतुकीचे दरही वाढल्याने व्यापारी त्याचा भार कांदा उत्पादकांनावर टाकतात. परिणामी शेतक:यांना भाव कमी दिला जात आहे.
     उत्पादनापेक्षा खर्च जास्त
    कांदा उत्पादक शेतक:याला शेत नांगरणी, वखरणी, सरी पाडणे, वाफे बनविणे, बियाणे टाकणे, कोरडे बियाणे, रोप तनविरहित ठेवणे, रोप लागवड करण, निंदनी, खांडणी, असा खर्च लागतो. त्याच्यापेक्षा निम्मे दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे 
एका वाफ्याला लागणारा खर्च असा
मशागत -10 रूपये, लागवड - 5 रूपये , रोप -10, निंदनी, फवारणी -20, रासायनिक खते -20 व खंडणी - 10, प्रतवारी व वाहतूक 2 असा एकूण प्रतिवाफे 77 रुपये खर्च शेतक:याला येतो. तर एका वाफ्यातून 15 ते 20 किलो कांदा निघतो. त्यास 2 ते 3 रुपये प्रतिकिलो एवढाच भाव मिळत असल्याने प्रति वाफे अवघे 40 ते 60 रुपये मिळत आहे. यानुसार उत्पादनासाठी प्रति वाफे 70 ते 77 रुपये खर्च करणा:यास शेतक:यास 17 ते 37 रुपये एका वाफ्याला नुकसान सहन करीत असल्याने त्याच्या डोळ्यात कांदा अश्रू आणीत आहेत.
सध्या 150 ते 200 रूपये मण (तीन ते चार रूपये किलो) या भावाने कांदा विक्री होत असून, किमान 500 रूपये मणने कांदा होणे अपेक्षित आहे, तर कांदा उत्पादक शेतकरी टीकू शकेल.
 

Web Title: Tears in the eyes of growers brought onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.