नेहरू चौकातील डीपीत तांत्रिक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:24 AM2021-09-10T04:24:38+5:302021-09-10T04:24:38+5:30

दुभाजकांमध्ये घाणीचे साम्राज्य जळगाव : शहरातील विविध ठिकाणच्या दुभाजकांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा कचरा मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे विद्रूपीकरण झाले आहे. या ...

Technical failure at DP at Nehru Chowk | नेहरू चौकातील डीपीत तांत्रिक बिघाड

नेहरू चौकातील डीपीत तांत्रिक बिघाड

Next

दुभाजकांमध्ये घाणीचे साम्राज्य

जळगाव : शहरातील विविध ठिकाणच्या दुभाजकांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा कचरा मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे विद्रूपीकरण झाले आहे. या कचऱ्यामुळे झाडांचे सौंदर्य कमी होत असून, या प्लास्टिक कच-यामुळे पावसाचे पाणी जागेवर न थांबता वाहून जात आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने शहरातील विविध ठिकाणचे दुभाजक स्वच्छ करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

भावेश ढाके व विशाल निकम यांची निवड

जळगाव : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जळगाव शहर सह-समन्वयकपदी भावेश ढाके तर विभाग समन्वयकपदी विशाल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे दीपक घ्यार, पवन सोनवणे, शुभम गवळी, विशाल बोदडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रथमोपचार पेट्यांचे वाटप

जळगाव : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे शहरातील विविध माध्यम क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रथमोपचार पेट्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मंगेश चिवटे, पारोळा बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, शहर वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक जितेंद्र गवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Technical failure at DP at Nehru Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.