टेली आयसीयूने मिळाले ५० रुग्णांना दिल्लीहून मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:14 AM2021-02-08T04:14:11+5:302021-02-08T04:14:11+5:30

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पूर्णत: कोविड असताना टेली आयसीयू ही यंत्रणा कार्यांन्वित करण्यात आली होती. त्या ...

Tele ICU gets guidance to 50 patients from Delhi | टेली आयसीयूने मिळाले ५० रुग्णांना दिल्लीहून मार्गदर्शन

टेली आयसीयूने मिळाले ५० रुग्णांना दिल्लीहून मार्गदर्शन

Next

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पूर्णत: कोविड असताना टेली आयसीयू ही यंत्रणा कार्यांन्वित करण्यात आली होती. त्या यंत्रणेद्वारे आतापर्यंत ५० पेक्षा अधिक रुग्णांसाठी थेट दिल्ली येथून तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मागवून उपचार करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने जुन्या अतिदक्षता विभागात या टेली आयसीयूची गरज पडल्यास वापर केला जात आहे.

आपत्कालीन अतिदक्षता विभाग, १४ क्रमांकचा अतिदक्षता विभाग आणि जुना अतिदक्षता विभाग अशा तीन ठिकाणी तीन कॅमेरे आणि मोठा मॉनिटर ठेवण्यात आला होता.

असे मागवायचे मार्गदर्शन

आधी दिल्लीच्या टीमला व्हॉट्सॲपवर संपर्क केला जात होता. त्यानंतर रुग्णाजवळ मॉनिटर नेऊन त्याचे व्हिडिओ दिल्लीच्या केंद्रात तज्ज्ञ डॉक्टरांना दाखविले जात होते. त्यानंतर डॉक्टरांशी संपर्क करून रुग्णांच्या उपचाराबाबत मार्गदर्शन मागविले जात होते. मात्र, ही यंत्रणा उशिरा दाखल झाल्याने हवा तसा या यंत्रणेचा वापर झाला नाही. कोरोनाचा मृत्युदर अधिक असताना ही यंत्रणा आलेली नव्हती. जेव्हा जीएमसीत डेथ रेट कमी होऊन रिकव्हरी रेट वाढला होता. तेव्हा ही टेली आयसीयू यंत्रणा दाखल झाली होती. आता या यंत्रणेचा वापर कमी होत असल्याची माहिती आहे.

Web Title: Tele ICU gets guidance to 50 patients from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.