महाबळ परिसरातील दूरध्वनी सहा दिवसांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:30 AM2020-12-14T04:30:53+5:302020-12-14T04:30:53+5:30
नुकसान : मक्तेदाराकडून केबल जोडणीसाठी मदतही मिळेना ‘अमृत’च्या कामामुळे अनेक ठिकाणी बीएसएनएल केबल तुटल्या जळगाव : शहरात अमृत योजनेचे ...
नुकसान : मक्तेदाराकडून केबल जोडणीसाठी मदतही मिळेना
‘अमृत’च्या कामामुळे अनेक ठिकाणी बीएसएनएल केबल तुटल्या
जळगाव : शहरात अमृत योजनेचे खोदकाम सुरू आहे. यामुळे शहरात अनेक ठिकाणी बीएसएनएलच्या केबल तुटल्या आहेत. यामुळे महाबळसह अन्य भागातील दूरध्वनी सहा दिवसांपासून बंद आहेत, तर इंटरनेटची गतीदेखील मंदावली आहे. मक्तेदाराकडून केबल जोडणीसाठी मदतही मिळेत नसल्याची माहिती बीएसएनएलचे महाव्यवस्थापक संजय केशरवाणी यांनी दिली.
शहरात अमृत योजनेंतर्गत रस्ते खोदून जलवाहिनीचे काम सुरू आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांत शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच दुसरीकडे ‘अमृत’च्या कामामुळे बीएसएनएलच्या केबल तुटत असल्याने, अनेक नागरिकांचे लॅन्डलाइन टेलिफोन बंद आहेत. परिणामी नागरिकांची गैरसोय होत आहे.
इन्फो :
मक्तेदाराकडून नुकसानभरपाईही मिळेना
सध्या बीएसएनएलकडे कमी मनुष्य बळ असल्यामुळे केबल जोडणीची कामे करण्यासाठी मनुष्य बळाची गरज भासत आहे. त्यामुळे केबल तुटल्यावर तातडीने नुकसानभरपाई द्यावी, तसेच जोडणीसाठी मनुष्यबळही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र, मक्तेदाराकडून नुकसानभरपाई किंवा मदत मिळत नसल्यामुळे जोडणीच्या कामाला विलंब होत आहे.
- संजय केशरवाणी, महाव्यवस्थापक, बीएसएनएल