जळगावात तापमान 41 अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2017 05:29 PM2017-04-12T17:29:34+5:302017-04-12T17:29:34+5:30
गेल्या तीन दिवसांपासून शहरात तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसर्पयत पोहचला आहे. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवर सकाळी 10 वाजेपासुन अघोषीत संचारबंदी पुकारली गेली असल्याचे भास निर्माण होत आहे.
Next
जळगाव,दि.12- गेल्या तीन दिवसांपासून शहरात तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसर्पयत पोहचला आहे. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवर सकाळी 10 वाजेपासुन अघोषीत संचारबंदी पुकारली गेली असल्याचे भास निर्माण होत आहे. अंगाची अक्षरश: लाही-लाही करत असलेल्या उन्हामुळे संपुर्ण रस्ते ओस पडलेले आहेत. तसेच संध्याकाळी 6 वाजेर्पयत घरातुन बाहेर निघायला देखील नागारिक धजावत नसल्याचे चित्र सध्या शहरात निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदाचा उन्हाळा जळगावकरांसाठी चांगलाच त्रास दायक ठरत आहे. मार्च महिन्यातच यंदा तापमानाने चाळशी पार केल्यानंतर एप्रिल मध्ये देखील सुर्य आग ओकत आहे. गेल्या तीन दिवसात जळघावच्या पा:यात तब्बल तीन अंशाची वाढ झाली असून रविवारी 38 अंश असलेले तापमान बुधवारी 41.2 अंशावर पोहचले होते.त्यामुळे सकाळपासूनच होणा:या उकाडय़ाने नागरिक त्रस्त आहेत. सकाळपासुनच उन्हाची तीव्रता जाणवत असुन दिवसभर उन्हाचे चटके बसत होते. तापमान सातत्याने वाढत असल्याने उष्णतेची लाट आली असल्याचा अनुभव जळगावकर सध्या घेत आहेत.