तापमान 44.5 अंश सेल्सीअसवर स्थिर

By admin | Published: April 18, 2017 01:10 AM2017-04-18T01:10:01+5:302017-04-18T01:10:01+5:30

उष्णतेच्या झळा रात्रीर्पयत : रस्ते निर्मनुष्य, वृद्ध, रुग्ण, बालकांना अधिक त्रास

Temperature remains steady at 44.5 degrees Celsius | तापमान 44.5 अंश सेल्सीअसवर स्थिर

तापमान 44.5 अंश सेल्सीअसवर स्थिर

Next

जळगाव : आठवडाभरापासून त्रासदायक ठरणारी उष्णतेची लाट कायम असून, त्याचा फटका वृद्ध, रुग्ण व बालके यांना अधिकचा बसत आहे. अंगाची लाहिलाही होत असल्याने अनेकजण घराबाहेर पडणे टाळत आहेत. यातच सोमवारी जैन हिल्स येथील हवामान शास्त्र विभागात 44.5 एवढय़ा कमाल तापमानाची नोंद झाली.
अबरी समुद्र क्षेत्रात हलके कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. लू वारे पश्चिमेकडून पूव्रेकडे अधिक गतीने येत असून, याचा फटका बसत आहे. ही उष्ण वा:यांची लाट पुढील आठवडाभर कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
घराबाहेर निघण्यास कुणी धजावेना
उष्णता एवढी त्रासदायक आहे की, अनेकांनी दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे टाळले. यामुळे दुपारी रस्त्यांवरील वर्दळ अतिशय कमी झाली होती. अगदी आकाशवाणी चौक ते पुढे रिंगरोड, काव्यरत्नावली चौक, नवी पेठ भागातही वर्दळ कमी होती.  अतिउष्णतेमुळे नागरिकांसोबतच पशु-पक्ष्यांनाही त्रास होत आहे. तसेच शेतीलाही मोठय़ा  प्रमाणात फटका बसत आहे
उष्ण वा:यांचा प्रकोप कायम राहणार
आणखी सात ते आठ दिवस उष्ण वा:यांचा प्रकोप कायम राहणार आहे. लू वा:यांचा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहील.
हवेत आद्र्रताही कायम असल्याचे दिसून येत आहे, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.सुदाम पाटील म्हणाले.
दिवसभरातील तापमानाची स्थिती
सकाळी  8 वा.- 32
9 वाजता- 36
10 वाजता - 38
11 वाजता - 41
12 वाजता - 42
1 वाजता - 44.5
2 वाजता- 44.4
3 वाजता- 44.1
5 वाजता- 40.0
मागील काही दिवसांचे तापमान
14 एप्रिल - 43.2
15 एप्रिल - 43.8
16 एप्रिल - 44.5

Web Title: Temperature remains steady at 44.5 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.