तात्पुरत्या साफसफाईने क्रीडा संकुल गजबजू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 10:38 PM2020-10-12T22:38:33+5:302020-10-12T22:40:24+5:30
आमदार अनिल पाटील यांनी क्रीडा संकुल तात्पुरते स्वच्छ केल्याने अनेक खेळाडू खेळ खेळू लागले आहेत.
अमळनेर : आमदार अनिल पाटील यांनी क्रीडा संकुल तात्पुरते स्वच्छ केल्याने अनेक खेळाडू खेळ खेळू लागले आहेत. क्रीडा संकुल गजबजू लागले आहे. यानिमित्त क्रीडा प्रेमींतर्फे आमदारांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या क्रीडा संकुलात मोठमोठे गवत उगवल्याने जेसीबीद्वारे ते काढून हे संकुल स्वच्छ करण्यात आले. जेथे चालणेही अवघड होते तेथे साफसफाईमुळे मैदान गजबजून फुटबॉल, कबड्डी, व्हॉलिबॉल, खोखो व क्रिकेट आदी खेळ सुरू झाले आहेत. भविष्यात सरकारकडून निश्चितच निधी आणून हे क्रीडासंकुल पूर्ण करणार आहे, मात्र काही दानशूर क्रीडाप्रेमींनी मदतीचादेखील हात द्यावा, असेही आवाहनही आमदारांनी सत्कार प्रसंगी केले.
आमदार पाटील यांनी मारवड रस्त्यावरील नियोजित क्रीडा संकुलात वाढलेले गवत चार जेसीबीद्वारे तीन दिवस मोहीम राबवून काढले. यामुळे या संकुलाचे रूप बदलले आहे. परिणामी असंख्य क्रीडाप्रेमी याकडे आकर्षिले जाऊ लागले आहे. यावेळी जेसीबी उपलब्ध करून देणारे बांधकाम व्यावसायिक धनंजय नथु पाटील, योगेश भरत पाटील, शशिकांत पाटील, धार नगरसेवक शेखा मिस्तरी आदींसह सेवा देणारे आर.बी.इन्फस्ट्रक्चरच्या कामगारांचेदेखील विशेष सत्कार करण्यात आला.
मंंचावर माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, नगरसेवक अभिषेक पाटील, तालुका क्रीडा संयोजक एस.पी. वाघ, माजी नगरसेवक विनोद कदम, योगेश पाटील, मेजर राजेंद्र यादव, ज्येष्ठ खेळाडू महादेव शिंदे, मिलिंद शिंदे उपस्थित होते. सुरवातीला संजय पाटील, संदीप सराफ व भाग्यश्री पाटील आदींनी मनोगत व्यक्त करत आमदारांच्या कार्याचे कौतुक करून क्रीडा संकुलाबाबत काही अपेक्षा व्यक्त केल्या.
जो सदैव ग्राउंडवर असतो तो ऊर्जा देणारा असतो, मात्र घरी बसून मोबाईलवर असणारा सदा निर्जीव राहतो, हे क्रीडा संकुल आपले असल्याने ते कायम स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी अधूनमधून खेळाडूंनीच श्रमदान मोहीम राबवून क्रीडा संकुल स्वच्छ ठेवले पाहिजे, असे आवाहन आमदार पाटील यांनी खेळाडूंच्या सत्काराला उत्तर देताना केले.
कार्यक्रमास क्रीडाशिक्षक किशोर मोरे, नीलेश विसपुते, महेश माळी, डी.डी.राजपूत, कमलेश मोरे, सॅम शिंगाने, रोहिदास महाजन, मनोरे, के.यु.बागुल,पप्पू चावरीया यासह उद्योजक अलीहुसेन बोहरी, अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, किशोर भदाणे, प्रदीप पाटील, सोमचंद संदनशिव, नितीन बोरसे, गुणवंत पाटील, कुंदन निकम, राहुल पाटील, उमाकांत हिरे, पाटील, डबेलकर, यतीन पवार, महेश पाठक आदींसह अनेक खेळाडू उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.