दहा दिवसात ७८१ रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 12:50 PM2020-06-23T12:50:40+5:302020-06-23T12:52:05+5:30

सर्वच तालुक्यांमध्ये उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे होणारे अधिक, तीन कोविड सेंटरमध्ये करण्यात आली

In ten days, 781 patients successfully overcame the corona | दहा दिवसात ७८१ रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात

दहा दिवसात ७८१ रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात

Next

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अगदीच झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण गेल्या दहा दिवसात अगदीच झपाट्याने वाढली आहे. दहा दिवसात ७८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे़ सरासरी ७८ रुग्ण दररोज बरे होऊन घरी जात आहे़ सद्यस्थितीत सर्वच तालुक्यात उपचार घेणाºयांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक असून ही बाब जिल्ह्यासाठी दिलासा देणारी मानली जात आहे़
जून महिन्यात रुग्णसंख्या अगदीच झपाट्याने वाढल्याने चिंता व्यक्त केली जात होती़ मात्र, दहा दिवसात शेकडो रुग्ण बरे झाल्याने अ‍ॅक्टीव केसेसची संख्या घटल्याने रुग्णालयांचा ताण काहीसा कमी झाला आहे़ डेडिकेटेट कोविड हॉस्पीटल्स, डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटर या तीन पातळ्यांवर आता रुग्णांची विभागणी करण्यात आली आहे़ जळगावातील शासकीय रुग्णालयात प्रचंड रुग्णांचा भार वाढल्याने गोदावरी रुग्णालयात काही रुग्ण हलविण्यात आले. यासह गणपती व गोल्डसिटी रुग्णालयातही काही रुग्ण उपचार घेत आहेत़ त्यामुळे यंत्रणेचा ताण कमी होत आहे़
कोविड रुग्णालयातून ४०६ रुग्ण झाले बरे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात संशयित व बाधित असे एकूण २३५१ रुग्ण दाखल झाले होते़ सद्यस्थितीत इथे ११७ बाधित रुग्ण असून एकत्रित या रुग्णालयातून ४०६ रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे़ ही बाब निश्चितच दिलासादायक आहे.
जिल्हा देश व राज्याच्या पुढे...काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण खालावलेले होते़ अगदी ४४ टक्के असलेले हे प्रमाण गेल्या दहा दिवसात वाढू आता ५९ टक्क्यांवर आलेले आहे़ देशाच्या व राज्याच्या मानाने हे प्रमाण अनुक्रमे चार व दहा टक्क्यांनी अधिक आहे़ देशाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५५ तर राज्याचे प्रमाण हे ४९ टक्के आहे़ दरम्यान, जिल्हाभरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भडगाव तालुक्यात सर्वाधिक आहे़
सातव्या, आठव्या व नवव्या दिवशी रुग्णाला लक्षणे नसतील तर त्याला घरी सोडण्याचे शासनाचे धोरण असून त्यानुसार रुग्णांना घरी सोडले आहे़ यात डॉक्टरांचे प्रयत्न आहेतच़ शिवाय नातेवाईकांचे सहकार्य, सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी बरे होण्याचे प्रमाण आपल्याकडे समाधानकारक आहे़ -डॉ़ एऩ एस़ चव्हाण,
जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव.

Web Title: In ten days, 781 patients successfully overcame the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव