जळगाव जिल्ह्यात एक हजार जन्मांमागे दहा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 01:20 PM2020-08-30T13:20:41+5:302020-08-30T13:21:18+5:30

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अर्भक मृत्यूचे प्रमाण घटले आहे़ सध्या स्थितीत हे प्रमाण राज्यात एक हजार जन्मामागे ...

Ten deaths after one thousand births in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात एक हजार जन्मांमागे दहा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात एक हजार जन्मांमागे दहा मृत्यू

Next

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अर्भक मृत्यूचे प्रमाण घटले आहे़ सध्या स्थितीत हे प्रमाण राज्यात एक हजार जन्मामागे १९ असून जिल्ह्यात ते दहावर आले आहे़ स्थानिक पातळ्यांवर गर्भवती महिलांसाठी प्रसुतीसाठी उपलब्ध सुविधा, सिझेरियनची सुविधा अशा विविध उ पाययोजना व जनजागृतीमुळे हे प्रमाण घटले आहे़ दरम्यान, जन्मदर हा दर वर्षी कमी जास्त होत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे़ २०११ च्या जणगणनेनुसार जिल्ह्याचा जन्मदार हा एक हजार लोकसंख्येमागे १८ जन्म असा आहे.
पुण्याच्या संस्थेकडून हा सर्व्हे होत असतो. स्थानिक पातळीवर तसा सर्व्हे होत नाही़ तर हा जन्मदार हा एक हजार लोकसंख्ये मागे १६ ते १८ जन्म असेच प्रमाण असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले़
कोविडच्या काळात अधिक काळजी
गर्भवती महिलांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक असल्याने त्यांची प्रसुतीच्या आधी कोविड चाचणी करून हा धोका टाळण्यासाठी शासकीय पातळीवरही प्रयत्न केले जात आहे़ त्याचबरोबर कोविड रुग्णालयात बाधित तसेच संशयित महिलांच्या प्रसुतीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे़ यात आतापर्यंत २५ बाधित महिलांचे सिझेरीयन तर १२ बाधित महिलांची सामान्य प्रसूती झाली आहे़ बाळांची प्रकृती उत्तम आहे़ यातील केवळ एकाच बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते़ त्या बाळानेही कोरोनाची लढाई जिंकली आहे़

Web Title: Ten deaths after one thousand births in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव