हतूनर धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडले, तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 04:21 PM2024-07-08T16:21:42+5:302024-07-08T16:21:55+5:30

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी या धरणाचे ४१ पैकी १० दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे.

Ten gates of Hatunar Dam opened by one meter alerting villages along Tapi  | हतूनर धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडले, तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

हतूनर धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडले, तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

वासेफ पटेल

भुसावळ  (जि. जळगाव) : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी या धरणाचे ४१ पैकी १० दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणातून १९.१०५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे तापी नदीला पूर आला आहे. 

मध्य प्रदेश आणि विदर्भातील अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. त्यामुळे तापी- पूर्णा नदीला पूर आला आहे. यातून हतनूर धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सोमवारी  दुपारी धरणाचे १० दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत, अशी माहिती हतनूर धरणाचे शाखाधिकारी भावेश चौधरी यांनी दिली. 

धरणातून तापी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे हतूनर धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याचबरोबर जनावरांनाही नदीपात्रात न सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Ten gates of Hatunar Dam opened by one meter alerting villages along Tapi 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव