उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवीधर गटाच्या दहा जागांसाठी होणार चौरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 09:21 PM2018-01-01T21:21:40+5:302018-01-01T21:22:25+5:30
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधर गटामधून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी २१ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी विद्यार्थी संघटनांसह राजकीय पक्षांमध्ये देखील जोरदार हालचाली सुरु झाल्या असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवासेना, कॉँग्रेस-राष्टÑवादीसह इतर संघटनांच्या पदाधिकाºयांचे पॅनल व मनसे अशी चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधर गटामधून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी २१ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी विद्यार्थी संघटनांसह राजकीय पक्षांमध्ये देखील जोरदार हालचाली सुरु झाल्या असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवासेना, कॉँग्रेस-राष्टÑवादीसह इतर संघटनांच्या पदाधिकाºयांचे पॅनल व मनसे अशी चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.
उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या प्राधिकरण प्रतिनिधीसाठी अभ्यास मंडळ, व्यवस्थापन परिषदेच्या प्रतिनिधींच्या निवडणुका सप्टेंबर महिन्यात पार पडल्या. मात्र अधिसभा सदस्यांसाठी पदवीधर गटाची निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेमुळे सप्टेंबर महिन्यात घेण्यात आली नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या प्राधिकरणे देखील अद्याप गठीत झालेली नाही. २१ जानेवारी रोजी आता निवडणूक होणार असल्याने इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
कॉँग्रेस,राष्टÑवादीच्या सदस्यांची झाली बैठक
पदवीधर गटाच्या निवडणुकीसाठी ३ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. त्यासाठी शनिवारी जळगावात राष्टÑवादी, कॉँग्रेससह इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाºयांची बैठक पार पडली. या बैठकीत पदवीधर गटाच्या १० जागांसाठी उमेदवारांच्या नावाची चर्चा करण्यात आली. बैठकीला माजी अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे, प्रभाकर चव्हाण, कॉँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, अविनाश भालेराव,देवेंद्र मराठे यांच्यासह काही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती सूत्रांनी दिली.
युवासेना लढविणार सर्व जागा
पदवीधर गटाच्या सर्व १० जागा युवासेना व शिवसेना लढविणार असल्याची माहिती युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रितेश ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तसेच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील या निवडणुकांच्या उमेदवारांबाबतची माहिती मागविली असल्याचे प्रितेश ठाकुर यांनी सांगितले. २ किंवा ३ रोजी धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याचे शिवसेना व युवासेना जिल्हाप्रमुखांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व उमेदवारांची नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
अभाविपसह मनसेही रिंगणात
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जळगावात झालेल्या अधिवेशनात विद्यापीठाच्या पदवीधर गटाच्या सर्व १० जागा लढविण्याची घोषणा झाली होती. तर मनसेचे जिल्हा सरचिटणीस अॅड.जमील देशपांडे यांनी विद्यापीठ नवनिर्माण मंचची स्थापना केली असून, या मंचाव्दारे पदवीधर गटाच्या दहा जागा लढविल्या जाणार असल्याची माहिती अॅड.जमील देशपांडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.