आरोग्य केंद्रांवर दहा हजार ॲन्टीजन किट रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:10 AM2021-02-19T04:10:36+5:302021-02-19T04:10:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता, संपूर्ण आरोग्य यंत्रणेचा पुन्हा हा संसर्ग रोखण्यासाठी वापरण्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता, संपूर्ण आरोग्य यंत्रणेचा पुन्हा हा संसर्ग रोखण्यासाठी वापरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्राना कोरोनाचा चाचणीचे दहा हजार किट रवाना केले आहे. दररोज किमान दीडशे ते दोनशे चाचण्या या प्रत्येक आरेाग्य केंद्राच्या अंतर्गत कराव्यात अशा सूचना सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
कोरोनाच्या चाचण्या वाढविण्याचे वरिष्ठ पातळीवरूनच आदेश आहेत. मात्र, जिल्ह्यात त्यामानाने कोरोना चाचण्यांची संख्या अद्यापही एक हजारांच्या खालीच असून दिवसाला किमान पंधराशे चाचण्या अपेक्षित आहेत. तेव्हा बाधित रुग्ण समोर येऊन कोरोना संसर्ग थांबविता येणार आहे. त्यासाठी आता आरोग्य यंत्रणा सतर्क होत आहे.
गर्दी नियंत्रण सरपंच, पोलीस पाटील यांची जबाबदारी
गावात कोणी बाहेरून नवीन व्यक्ती आलेली आहे का? कोणता मोठा कार्यक्रम होणार आहे का? याची सर्व माहिती प्रशासनाला कळविणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे याबाबींची जबाबदारी ही संबधित गावाच्या सरपंच व पोलीस पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. गटविकास अधिकाऱ्यांना सीईओ डॉ. पाटील यांनी तशा सूचनाही दिलेल्या आहेत.