कोविशिल्डचे दहा हजार डोस केवळ शहरासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:13 AM2021-06-28T04:13:23+5:302021-06-28T04:13:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविशिल्ड लसीचे दहा हजार डोस जिल्ह्याला प्राप्त झाले असून, हे सर्व डोस महापालिका आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविशिल्ड लसीचे दहा हजार डोस जिल्ह्याला प्राप्त झाले असून, हे सर्व डोस महापालिका आणि रोटरी व रेडक्रॉस या केंद्रांनाच या डोसचे वाटप केले जाणार आहे. यामुळे शहरातील लसीकरणाला गती येणार आहे. सोमवारी शहरातील सर्व केंद्र सुरू राहणार आहे.
शहरात लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने केंद्र एक दिवस सुरू तर एक दिवस बंद अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता मिळालेल्या लसींचे डोस हे दोन दिवस जाण्याची शक्यता असून त्यामुळे १८ ते ४४ वयोगटांला काहीसा दिलासा मिळणार आहे. रविवारी लस नसल्याने सर्वच केंद्र बंद होते. दरम्यान, शनिवारी लस न मिळाल्याने काही केंद्रांवर गोंधळ उडाला होता. यात नानीबाई रुग्णालयात अनेक लाभार्थी लस न घेता माघारी परतले होते.
असे आहे लसींचे वाटप
दहा हजार कोविशिल्ड, पहिला व दुसरा डोस
पाच हजार कोव्हॅक्सिन केवळ दुसरा डोस
महापालिकेची केंद्र ४५००
गोदावरी ५००
रेडक्रॉस, रोटरी - ५ हजार
या केंद्रावर १८ ते ४४ वयोगटांचे लसीकरण
छत्रपती शाहूनगर हॉस्पिटल, डी. बी. जैन हॉस्पिटल, शाहीर अमर शेख हॉस्पिटल, काशीबाई कोल्हे विद्यालय, पिंप्राळा मनपा शाळा, कांताई नेत्रालय, रेडक्रॉस रक्तपेढी, रोटरी भवन.
या केंद्रांवर, ४५ वर्षांवर लसीकरण
कांताई नेत्रालय, नानीबाई अग्रवाल रुग्णालय