आश्रमशाळेतील 10 वर्षावरील रोजंदारी कर्मचारी कायम सेवेत

By admin | Published: April 7, 2017 04:08 PM2017-04-07T16:08:21+5:302017-04-07T16:08:21+5:30

आदिवासी विकास विभागाच्या विविध आश्रमशाळांमध्ये रोजंदारीने काम करणा:या वर्ग 3, वर्ग 4 कर्मचा:यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

Ten-year-old wage earner will always be in the ashram school | आश्रमशाळेतील 10 वर्षावरील रोजंदारी कर्मचारी कायम सेवेत

आश्रमशाळेतील 10 वर्षावरील रोजंदारी कर्मचारी कायम सेवेत

Next

रांझणी, जि. नंदुरबार, दि. 7 - आदिवासी विकास विभागाच्या विविध आश्रमशाळांमध्ये रोजंदारीने काम करणा:या वर्ग 3, वर्ग 4 कर्मचा:यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता  10 वर्षावरील रोजंदारी कर्मचारी आदिवासी विकास विभागाच्या सेवेत सामावून घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितल़े
नंदुरबार आणि तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत एक हजार 160 वर्ग तीन व वर्ग चार कर्मचारी कार्यरत आहेत़
 या शिष्टमंडळाने नंदुरबार आणि तळोदा प्रकल्पांतर्गत येणा:या आश्रमशाळा कर्मचा:यांच्या विविध समस्या मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्यासमोर मांडल्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी  सांगितले की, आश्रमशाळांमध्ये 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीत रोजंदारीने काम करणारे वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचा:यांना शासकीय सेवेत कायम सामावून घेणार, यातील पाच वर्षापासून काम करणा:यांना कामावरून कधीही काढले जाणार नाही़ याबाबत लेखी पत्र देणार आणि सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार इतर रोजंदारी कर्मचा:यांना त्यांना कामानुसार समान काम समान वेतन हा अधिकार लागू करणार असल्याच्या घोषणा केल्या़   आदिवासी विकास विभागासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे, कळवले आह़े नंदुरबार आणि तळोदा प्रकल्पासह धुळे, नाशिक आणि कळवण, यावल  प्रकल्पांतर्गत येणा:या विविध आश्रमशाळांमधील रोजंदारी कर्मचा:यांचे प्रतिनिधीही या बैठकीसाठी उपस्थित होत़े 

Web Title: Ten-year-old wage earner will always be in the ashram school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.