चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाºयास दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:35 PM2017-10-09T23:35:27+5:302017-10-09T23:38:03+5:30
चार वर्षीय मुलीला घरात बालावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया नेमलाल सुकलाल पाटील (वय ३५,रा.धरणगाव) याला न्यायालयाने सोमवारी दहा वर्ष सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने अशी शिक्षा सुनावली.
Next
ठळक मुद्देजळगाव न्यायालयाचा निकाल २०१३ मध्ये धरणगाव येथे घडली होती घटना दंडाच्या रकमेतून ५ हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेश
आ नलाईन लोकमत जळगाव दि, ९ :; चार वर्षीय मुलीला घरात बालावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया नेमलाल सुकलाल पाटील (वय ३५,रा.धरणगाव) याला न्यायालयाने सोमवारी दहा वर्ष सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने अशी शिक्षा सुनावली. याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव येथील नेमलाल पाटील याने २१ फेब्रुवारी २०१३ रोजी दुपारी दीड वाजता चार वर्षाच्या पीडित मुलीली त्याच्या घरात बोलावून अत्याचार केला होता. झाल्याप्रकाराची माहिती पीडित मुलीने आईला दिली होती. त्यानुसार पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन संशयिताविरुध्द बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. न्या.के.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात हा खटला चालला.यात लहान मुलांच्या लैंगिक अत्याचाराच्या छळापासून प्रतिबंधाचा कायदा कलम ४ व ६ खाली नेमलाल पाटील याला दोषी धरण्यात आले. त्यानुसार दहा वर्ष सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने अशी शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून ५ हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेश देण्यात आले. यांच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्ण पीडित मुलीची आई, पंच राहूल बडगुजर, वैद्यकीय अधिकारी डॉ.रेश्मा निरमले, तपासाधिकारी डी.एस.शिनगारे, सहायक निरीक्षक दिलीप गढरी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अॅड.सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.