चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करणा:यास दहा वर्षाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 11:55 AM2017-10-10T11:55:53+5:302017-10-10T11:56:36+5:30
दहा वर्ष सक्तमजुरी, 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 10 - चार वर्षीय बालिकेला घरात बालावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा:या नेमलाल सुकलाल पाटील (वय 35, रा.धरणगाव) याला न्यायालयाने सोमवारी दहा वर्ष सक्तमजुरी, 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने अशी शिक्षा सुनावली.
धरणगाव येथील नेमलाल पाटील याने 21 फेब्रुवारी 2013 रोजी दुपारी दीड वाजता चार वर्षाच्या पीडित मुलीली त्याच्या घरात बोलावून अत्याचार केला होता.
न्या.के.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात लहान मुलांच्या लैंगिक अत्याचाराच्या छळापासून प्रतिबंधाचा कायदा कलम 4 व 6 खाली नेमलाल पाटील याला दोषी धरण्यात आले. दंडाच्या रकमेतून 5 हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेश देण्यात आले.
पीडित मुलीची आई, पंच राहूल बडगुजर, वैद्यकीय अधिकारी डॉ.रेश्मा निरमले, तपासाधिकारी डी.एस. शिनगारे, सहायक निरीक्षक दिलीप गढरी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील अॅड.सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.